शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 20:43 IST

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्दे गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली.

पुणे : डेक्कन भागात भाड्याने घेतलेल्या हॉटेल व्यवसायात पाऊण कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने नाशिकमधील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ भारत बाळासाहेब ढेरिंगे (वय २७, रा. मिडोरी सोसायटी, बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक नरेंद्र तापकीर, उमेश शिंदे आणि वरुणराज शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बाळासाहेब ढेंरिगे (वय ५०, रा.पळसे, जि. नाशिक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे यांचे डेक्कन भागात वरुणराज हॉटेल आहे. उमेश शिंदे आणि त्यांचा मुलगा वरुणराज यांनी हे हॉटेल नरेंद्र तापकीर यांना चालवायला दिले होते. शिंदे यांनी तापकीर यांच्याबरोबर करार केला होता.  नाशिक भागातील शेतकरी बाळासाहेब ढेरिंगे यांचा मुलगा भारत तेथे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. दोन वर्षांपूर्वी तो पुण्यात आला होता. विवाहित असलेल्या भारत यांचा तापकीर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर तापकीर यांनी वरुणराज हॉटेल भारत यांना चालवायला दिले होते. हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यापोटी २५ ते ३० लाख रुपये खर्च झाल्याचे तापकीर यांनी त्याला सांगितले होते. भारतने तापकीर यांना ५० लाख रुपये दिले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तापकीर यांचा करारनामा संपल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा हॉटेल चालविण्यास मागितले होते. त्यानंतर तापकीर यांनी भारत याला हॉटेल सोडण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत नैराश्यात होता. त्याने तापकीर आणि वरुणराज हॉटेलचे मालक शिंदे यांची भेट घेतली होती. या प्रकरणात काही तोडगा काढा, असे त्याने सांगितले होते. महिनाभरापूर्वी भारतने पुन्हा काही रक्कम त्यांना दिली होती. हॉटेलवरचा ताबा सोडण्यास त्याला सांगण्यात आले होते. गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तसेच फसवणूक झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे भारत यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करत आहेत.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीhotelहॉटेलPolice Stationपोलीस ठाणे