शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन हल्लेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद

By admin | Updated: July 6, 2017 02:57 IST

कारेगाव (ता. आंबेगाव) येथे सुनील किसन घेवडे या शेतकऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना मंचर पोलिसांनी जेरबंद केले

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : कारेगाव (ता. आंबेगाव) येथे सुनील किसन घेवडे या शेतकऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना मंचर पोलिसांनी जेरबंद केले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सर्व घटना चित्रित झाल्याने आरोपींची ओळख पटली. या प्रकरणी शन्मुख ऊर्फ गोंड्या गणेश थिगळे (वय १८, रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर), शुभम नामेंद्र मोदगेकर (वय १९, रा. स्वामीसमर्थ बिल्डींग, खेड) तसेच एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. जमिनीच्या जुन्या वादातून हा खुनी हल्ला झाल्याचे तपासातून पुढे आले आहे.कारेगाव येथील सुनील किसन घेवडे यांचे मृत चुलत चुलते गणपत नामदेव घेवडे यांच्याबरोबर १५ वर्षांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य सबंधित तरुणांनी केल्याचे तपासात पुढे आले आहे. सुनील घेवडे पेठ येथील हॉटेलमध्ये चुलते देवराम घेवडे यांच्याबरोबर चहा पीत होते, त्या वेळी त्यांना मोबाईलवर फोन आला होता. शन्मुख ऊर्फ गोंड्या, गणेश थिगळे व इतर दोघे पेठ येथील चौकात आले. त्याने सुनील घेवडे यांना ‘दुचाकीवर बस व कारेगावला चल,’ असा सज्जड दम भरला. कारेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर दुचाकी थांबवून शन्मुख ऊर्फ गोंड्या गणेश थिगळे याने ‘बऱ्याच वर्षांपूर्वी माझे आजोबा गणपत नामदेव घेवडे यांच्याबरोबर भांडणे केली होती ना? आता तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून त्याच्या कंबरेला असलेला सुरा काढून सुनील घेवडे यांच्यावर वार केले. घेवडे यांच्या तोंडावर, डोक्यावर, हातावर, पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. मंचर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.