शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

सविंदणे दरोड्यातील तिघांना अटक, पुण्यासह नगरमध्येही केल्या अनेक चो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:43 IST

शिरूर तालुक्यात सविंदणे येथे मागील आठवड्यात दरोडा घालणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात सविंदणे येथे मागील आठवड्यात दरोडा घालणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तीन आरोपींना अटक केली आहे. पुणे व नगर जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगारांना अटक केल्याने दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या पथकाने निघोज (ता. पारनेर) येथून रामदास ऊर्फ चिवड, गोपाळ काळे (वय ३५), पप्पू आलम काळे (वय २५), तसेच गुणोरे (ता. पारनेर) येथून राधेश ऊर्फ राध्या संजय काळे (वय २८) यांना शिरूर येथे सापळा रचून पकडण्यात आले. हे आरोपी जोशीवाडी शिरूर येथे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आरोपींनी दरोडा टाकल्याची कबुली दिली असून, त्यांच्यासोबत चार आरोपी होते.याबाबत अधिक माहिती अशी, सविंदणे येथील फुलाबाई सुखदेव वायकर, दत्तात्रय चंदू कदम, रामदास सुदाम पडवळ यांच्या घरावर १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दरोडा टाकून १ लाख २३ हजारांचा ऐवज लुटला होता. तलवार आणि कुºहाडीचा धाक दाखवून दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. गावडे यांनी शिरूर पोलीस ठाण्याला चांगले काम केले असल्यामुळे, त्यांना परिसरातील गुन्हेगारांची माहिती होतीच. पथकाने माहिती घेतली असता, त्याच दिवशी पोंदेवाडी रोडेवाडी (आंबेगाव) येथे अशोक कोंडिबा अमोडकर यांच्या घरी चोरी करून सुमारे २२ हजारांचा ऐवज लांबविला. या आरोपींनी येथून रस्त्यावरच सविंदणे येथे दरोडा टाकला. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार हे आरोपी मलठणवरून टाकळी हाजी कुंडमार्ग पारनेर तालुक्यात गेले. मग तपासाचे सूत्र निघोज गावाकडे वळले. पोलिसांनी कपडेवाला, फेरीवाला, तसेच विविध प्रकारे वेशांतर करून या आरोपीवर लक्ष ठेवले होते. आरोपी हे मोबाईल विक्रीसाठी शिरूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार लक्ष ठेवून त्यांना अटक करण्यात आली.पोलीस पथकाममध्ये सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर, राजू मोमीन, पोपट गायकवाड,महेश गायकवाड, नीलेश कदम, समाधान नाईकनवरे यांनी चांगली कामगिरी केली.यामधील आरोपींनी शिंदोडी (ता. शिरूर) येथील चोरीचीसुद्धा कबुली दिली आहे. हे सराईत गुन्हेगार असून त्यांची प्रचंड दहशत पुणे, नगर जिल्ह्यात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा