शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

आरटीओच्या खिशात हजार कोटींचा महसूल, शहर आरटीओचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:59 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, तब्बल १ हजार ८७० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले आहे.

पुणे  - प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, तब्बल १ हजार ८७० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले आहे.परिवहन विभागाचे पुणे विभागाचे कार्यालय पुण्यामध्ये आहे. या विभागाअंतर्गत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज येथील कार्यालयांचा समावेश होतो.राज्यात दर वर्षी पुणे विभागाचा महसूल इतर विभागांच्या तुलनेत जास्त असतो. प्रामुख्याने पुणे शहर कार्यालयाच्या महसुलामध्ये दर वर्षी मोठी भर पडत असते. वर्षागणिक वाहनांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे शहराच्या महसुलात कोट्यवधी रुपये जमा होतात. २०१७-१८ या वर्षांत पुणे कार्यालयांतर्गत सुमारे २ लाख ९० हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. या आर्थिक वर्षात महसुलात विक्रमी वाढ होऊन एकट्या शहर कार्यालयात महसूल हजार कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत राज्यात पहिल्यांदाच एखाद्या कार्यालयाने हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शहर कार्यालयासाठी यावर्षी सुमारे ८६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, हा टप्पा ओलांडून कार्यालयाने तब्बल १ हजार २१ कोटी ५६ लाख रुपयांवर झेप घेतली. २०१६-१७ या वर्षीच्या तुलनेत हा महसूल २३७ कोटींनी अधिक आहे.आॅनलाईनला वाढता प्रतिसादआरटीओ कार्यालयामध्ये दि. १ नोव्हेंबरपासून वाहनांसंबंधी सर्वप्रकारच्या कामकाजासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आॅनलाईन माध्यमातून शुल्क भरण्यासाठी प्रतिसाद वाढत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत नवीन वाहन नोंदणी व वाहनासंबंधित कामकाजासाठी कार्यालयाकडे एकूण २८३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यापैकी आॅनलाईन पद्धतीने २७२ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. परवान्यासाठी एकूण जमा झालेल्या ५ कोटी ३५ लाख रुपयांपैकी ५ कोटी २२ लाख रुपये आॅनलाईन भरले गेले आहेत.शिकाऊ परवान्यांमध्ये घटशिकाऊ परवाने घेण्यामध्ये मागील वर्षभरात मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१६-१७ या वर्षात १ लाख ८५ हजार ५२८ जणांनी शिकाऊ परवाना घेतला होता. त्यापैकी ७२ हजार २९१ जणांनी पक्का परवाना काढला, तर २०१७-१८ मध्ये शिकाऊ परवान्यांची संख्या घटून १ लाख ३६ हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र, त्याचवेळी पक्का परवाना काढणाºयांच्या संख्येत वाढ झाली असून, ८१ हजार ३८१ जणांनी हा परवाना घेतला आहे. परवाना काढण्यासाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. परवाना मिळण्याची प्रक्रिया सोपी राहिली नाही. त्यामुळे पक्का परवाना घेणाºयांची संख्या तुलनेने वाढली असल्याचे आजरी यांनी सांगितले.कार्यालयाकडून सोळा सेवा आॅनलाईन पद्धतीने नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसचे विविध दंडाच्या रकमेत तसेच करांमध्ये झालेली वाढ, वाहनांची वाढती संख्या, कारवाई यामुळे महसुलामध्ये वाढ झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच पुणे शहराने महसुलात एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.- बाबासाहेब आजरी,प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभागआकर्षक क्रमांकांतून मोठी कमाईप्रामुख्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना आकर्षक क्रमांकांसाठी मोठी मागणी असते. त्यामुळे आरटीओकडून असे क्रमांक राखीव ठेवून लिलाव प्रक्रियेतून हे क्रमांक सर्वाधिक रकमेची बोली लावणाºयास दिले जातात. या प्रक्रियेतून पुणे विभागाला वर्षभरात तब्बल २३ कोटी ७६ लाख रुपयांची कमाई झाली आहे. वर्षभरात ‘१’ या क्रमांकासाठी सर्वाधिक साडेसहा लाख रुपये मिळाले आहेत.आरटीओ कार्यालय, पुणे विभागालामिळालेला महसूल (कोटींत)कार्यालय वर्ष वाढ वाढीची२०१६-१७ २०१७-१८ टक्केवारीपुणे ७८३.९३ १०२१.५६ २३७.६३ १३०पिंपरी-चिंचवड ४५४.३६ ५६०.९५ १०६.५८ १२३बारामती ६७.१४ ८३.३३ १६.१८ १२४पुणे जिल्हा एकूण १३०५.४४ १६६५.८४ ३६०.४० १२७सोलापूर १२७.७८ १५९.६० ३१.८१ १२४अकलूज ३७.८१ ४५.४७ ७.६६ १२०पुणे विभाग एकूण १४७१.०४ १८७०.९२ ३९९.८८ १२७

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस