शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

घाण, गुन्हेगारीमुळे नरकयातना, जनता वसाहत, समस्यांच्या दलदलित राहतात हजारो नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:26 IST

जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून

- गौरव कदमसहकारनगर : जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून, गुन्हेगारी व अवैध धंदे, राजकीय व शासकीय दुर्लक्ष यामुळे येथील नागरिक नरकयातना जगत आहेत.आपल्या मुलांना भविष्यात निरोगीपणे जगता यावे, यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय योजनेतील वैयक्तिक शौचालय बांधणीतील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता. म्हणजेच शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातच शुद्ध फसवणूक होत असल्यास परिस्थिती आणखी दयनीय होत जाणार आहे.वसाहतीमध्ये मोठे दिखाऊ प्रकल्प करून सर्वसामान्य जनतेने भरलेल्या कराचा चुराडा करण्यापेक्षा स्वछता, शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या चांगले प्रकल्प उभारणे व टिकविणे येथे गरजेचे आहे. एकीकडे सर्वसामान्य पुणेकर पाणीपट्टी भरून पाणी काटकसरीने वापरत असताना जनता वसाहतमध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचा अपव्यय पाहून अंगावर काटा येतो. सकाळच्या वेळेत येथे बºयाच ठिकाणी पाण्याचे नळ बंद केलेच जात नाहीत. पाणी वाहत मलवाहिन्यांत जात असते. अनेक ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त असून, त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहण्यास मिळाले.गुन्हेगारी व अवैध धंदेजुन्या हिंदी सिनेमात पाहण्यास मिळत असत, तसेच अनेक भाई-दादा जनता वसाहत झोपडपट्टीमध्येसुद्धा पाहण्यास मिळतात. सध्या गुन्हेगारीचा आलेख कमी असला, तरी दारूअड्डे, अवैध धंदे येथे सुरूच आहेत. नाना प्रकारची व्यसने युवक करताना पाहण्यास मिळतात. युवकांना नोकरी-रोजगार नसल्याने व्यसने व गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे इतक्या मोठ्या जनता वसाहतीमध्ये एकही अभ्यासिका नाही. महिलांना सुद्धा रोजगार मोठ्या प्रमाणात नसल्याने धुण्या-भांड्याच्या कामांव्यतिरिक्त रोजगार, बचत गट, लघू महिला उद्योग सुरू होणे गरजेचे आहे.दवाखान्याचा अभाव, कचरा, रस्ते, शौचालये बेरोजगारी आणि वाढते अतिक्रमणयेथील पार्किंगचा प्रश्न मोठा असून, तो सोडविला जाणे गरजेचे आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, त्याचा पाठपुरावा आम्ही करतच आहोत; अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महिला व युवकांना चांगला रोजगार व प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, अभ्यासिका वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी, अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने अतिक्रमणे व झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.- सूरज लोखंडे,सामाजिक कार्यकर्ताहे जनता वसाहतमध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत. जनता वसाहत येथे नागरिकांना अनेक समस्या भेडसावताना दिसत आहेत; परंतु वसाहत पातळीवर येथील रहिवाशांना भविष्यात स्वत:ची हक्काची घरे मिळाल्यानंतरही तेथील देखभाल खर्च करणे याची मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगली रोजगारनिर्मिती होणे गरजेचे आहे. महिलांना लघुउद्योग प्रकल्पाद्वारे सकारात्मक पाठिंबा देणे गरजेचे आहे. संस्कार, आरोग्य, निर्व्यसनीपणा, शिक्षण यामुळेच युवक विकसित होऊ शकतो. नागरिकांना स्वछतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. - राहुल माने,आदर प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्तेराजकीय व शासकीय दुर्लक्ष ठरतेय अंधारमयजनता वसाहतीमध्ये राजकीय व शासकीय दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारविरुद्ध मोठ्या संख्येने मोर्चा काढून प्रकल्पातील फसवणुकीस विरोध केलेला आहे.येथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या हक्काची घरे होण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसेच जनता वसाहतीमधील कुठलाही नागरिक बेघर होऊ नये, यासाठी लढा देणार आहे.वस्तीतील समस्यांचे निराकरण होताना दिसत नाहीशौचालयांची बिकट अवस्था आहे. पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. डोंगर भागात, कॅनॉलकडेने कचरा साठून आहे. कचरा व्यवस्थापनचा आराखडाच तयार नाही.अ‍ॅम्ब्युलन्सच्या शेडने फक्त जागा अडवून ठेवली आहे. त्यात नागरिकांच्या गरजेला अ‍ॅम्ब्युलन्सच उपलब्ध नाही. परिसरात औषधफवारणी होत नसल्याने संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.जनता वसाहतीमध्ये लोकांच्या मागणीनुसार हक्काची पक्की घरे मिळणे गरजेचे आहे, यासाठी लोकांशी संवाद साधून शासकीय योजने अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होत असल्यास त्याचे स्वागत आहे. या विषयात राजकारण न होता, नागरिकांनी पूर्ण माहिती घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. भविष्यात महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजही तीसपेक्षा जास्त बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व वचक नसल्यामुळे झोपड्या वाढत आहेत. संरक्षण भिंत होणे गरजेचे आहे. पार्किंगप्रश्नाबाबत प्रामाणिकपणे पाठपुरावा करूनही प्रशासकीय पातळीवर सहकार्य होत नसल्याने पार्किं ग प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी कमी बजेटमध्ये हॉल तयार करण्यात आला आहे.- प्रिया गदादे-पाटील, नगरसेविका

टॅग्स :Puneपुणे