शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रभात पुरस्कारांवर ‘एक हजाराची नोट’ची मोहोर

By admin | Updated: June 2, 2015 05:02 IST

आॅनलाईन मतदानावर मिनिटा-मिनिटाला उत्कंठा वाढविणाऱ्या प्रभात पुरस्कारांची आॅनलाईन घोषणा सोमवारी झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘

पुणे : आॅनलाईन मतदानावर मिनिटा-मिनिटाला उत्कंठा वाढविणाऱ्या प्रभात पुरस्कारांची आॅनलाईन घोषणा सोमवारी झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. इतर पुरस्कारांत ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने मोहोर उमटविली आहे. फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) प्रभात कंपनीच्या म्युझियममध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘प्रभात जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, प्रभातचे विवेक दामले, अनिल दामले, निवेदक राजेश दामले उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘आॅनलाईन’ माध्यमातून निवड करण्याचा हा नवीन पायंडा ‘प्रभात’ने पाडला. दुपारी १२ नंतर प्रत्येक तासाला ४ पुरस्कार घोषित करण्यात येत होते. त्यामुळे सर्वांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. अशा प्रकारे एकूण २७ पुरस्कारांची आॅनलाईन नावे जाहीर करण्यात आली. आयुष्यभर चित्रपटांचा ध्यास घेतलेल्या राजदत्त यांच्यासारख्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे डॉ. जब्बार पटेल म्हणाले.