शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २४ गावांचा स्वतंत्र आराखडा करणार

By admin | Updated: May 6, 2015 06:21 IST

भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक राव यांच्या अध्यक्षतेखील मंगळारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, सैन्यदलाचे कर्नल मराठे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी राव यांनी सांगितले, की माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये जिल्ह्यात २४ गावांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी या गावांचा स्वतंत्र आराखडा करावा, याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पुन्हा माळीणसारखी दुर्घटना झालीच, तर त्या गावातील लोकांना कोठे हलविणार, बचाव आणि मदत कार्य कसे राबविणार, याबाबत आराखडा तयार करताना प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.दरम्यान, याशिवाय पूरग्रस्त, प्रवण गावांचा आराखडा तयार करून आश्रयासाठी गावांतील शाळा, समाज मंदिरे आदी ठिकाणे निश्चित करून ठेवली जावीत, याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही महापालिकांनादेखील त्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले आहे.४पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती करावी, यंत्रसामग्री सज्ज ठेवा.४मोबाईल रेंज पोहोचू शकत नाही, असे परिसर निश्चित करून तेथे पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.४शहर आणि जिल्ह्यातील पूल व महत्त्वाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीचे रेखाकंन करावे.४आरोग्य विभागाने रुग्णावहिकांची सेवा अव्याहत सुरू राहील,याची खात्री करावी.४जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करावा.