शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीसह ३0 हजार ग्रामस्थ तहानले

By admin | Updated: April 23, 2016 00:55 IST

बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले

बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले आहे. या परिसरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे जवळपास १० मोठ्या कंपन्या, त्यांच्यावर अवलंबून असलेले जवळपास ३०० लघुउद्योग अडचणीत आले आहेत. बारामतीच्या या उद्योगनगरीतील अर्थव्यवस्था पाण्यामुळे धोक्यात आली आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र शनिवारपासून (दि. २३) पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला आहे. तरीदेखील पाण्याची गंभीर समस्या असताना पाणी उपलब्ध होणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एमआयडीसीतील रहिवासी झोनसह कटफळ, वंजारवाडी, गोजूबावी, रूई, तांदूळवाडी येथील २५ ते ३० हजार नागरिक तहानलेले आहेत. या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर काही नागरी वसाहती वर्गणी करून टँकरने पाणी विकत घेत आहेत. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उद्योगनगरीतील नागरी वस्त्यांमध्ये जारमधील पाण्याची विक्री जोरदार सुरू आहे. यासह कंपन्यांमध्ये दैनंदिन वापराच्या व पिण्याच्या पाण्यावर मर्यादा आली आहे. उजनीचे पाणी घेण्यासाठी चारी खोदून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आणखी दीड ते दोन महिने ही कसरत करावी लागणार आहे, अशी स्थिती या परिसरात आहे. (प्रतिनिधी)जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. रस्त्याला आडवे छिद्र घेण्याचे काम सुरू आहे. १५ ते २० दिवसांत जुन्या जलवाहिनीतून पाणी सोडणे बंद होईल. त्यामुळे पाणीचोरीचा प्रश्न मार्गी लागेल. नवीन जलवाहिनीतून प्रतिदिन १६ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा होईल. उजनी जलाशयात पावसाळ्यापर्यंत पुरवठा होईल, एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे उद्योजकांना पाण्याची चिंता नाही. याशिवाय पाणी न देऊ शकणाऱ्या भागात उद्योजकांना विंधनविहीर घेण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र, त्यासाठी भूजल संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पाणीपुरवठा सुरू होऊनदेखील उपयोग होण्याची शक्यता नाही. अजूनही जुन्या जलवाहिनीतून पाणीगळती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्या पाणी मिळण्याची शाश्वती नाही. याबाबत पाणी न मिळाल्यास शनिवारी उद्योजकांना घेऊन एमआयडीसी प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. ते रोखण्यावर एमआयडीसीने भर दिला पाहिजे. - प्रमोद काकडे , अध्यक्ष, बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजवापरासाठी टँकरने विकतचे पाणी येथील नागरिक घेत आहेत. तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आम्हाला पोहोचावे लागत आहे. ५ हजार लिटर पाण्यासाठी ६०० ते ७०० रुपये व्यावसायिकांकडून घेतले जात आहे. तर, पैसे भरून देखील सध्या टँकरचे पाणी विकतदेखील मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. किमान पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यावर एमआयडीसीने उपाय शोधला पाहिजे. - अण्णा पवळ, एमआयडीसीतील रहिवासी जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण शुक्रवारी (दि. २२) सकाळी भेट घेतली. तसेच, या प्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली. त्याची दखल घेऊन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. जलशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे केवळ याच काळात प्रलंबित कामे पूर्ण करणे शक्य आहे. - धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रीअल असोसिएशन