शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दौैंडच्या तिसऱ्या मोरीचे काम लवकरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:53 IST

विजयकुमार थोरात : १५ फेब्रुवारीदरम्यान सुरू होणार; जनतेचा श्वास मोकळा होणार

दौैंड : दौंड शहरातील तिसºया रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामाला १५ फेब्रुवारीच्या दरम्यान सुरुवात होईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. साधारणत: १0 महिन्यांच्या जवळपास ही कुरकुंभ मोरी होईल, असा एकंदरीत अंदाज असून सदरचे बांधकाम सुरू करण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराला १५ जानेवारीच्या जवळपास रेल्वे खाते देईल, असे डॉ. विजयकुमार थोरात यांनी स्पष्ट केले.

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे कुरकुंभ मोरीतील वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरातील नागरिक हैैराण झाले होते. मोरीत अपघात होऊन ऐन पावसाळ्यात एका व्यक्तीचा बळी गेला होता. परंतु रेंगाळलेले कुरकुंभ मोरीचे काम सुरू होत आहे. निश्चितच या मोरीत गुदमरत असलेला जनतेचा श्वास मोकळा होणार आहे. सदरच्या मोरीसंदर्भातील कामकाज चार टप्प्यांतील असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील हनुमान मंदिराजवळील रेल्वे क्वॉर्टर काढण्यात येणार आहे. तर त्याबदल्यात १0 क्वॉर्टर अन्य रेल्वेच्या जागेत बांधण्यात येणार आहे. हनुमान मंदिराजवळील क्वॉर्टर काढल्यानंतर कुरकुंभ मोरीच्या बांधकामाला मोकळीक मिळेल. दुसºया टप्प्यात मोरीचा बॉक्स कुशीन करण्यात येणार आहे, तर तिसºया टप्प्यात केबल सेटिंग आणि चौैथ्या टप्प्यात विद्युतीकरणाचे काम होणार आहे. दौैंड शहर दोन विभागांत विभागलेले आहे. केवळ रेल्वे कुरकुंभ मोरीअभावी शहराचा विकास खुंटलेला आहे. पावसाळ्यात या मोरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. एरवीही रोजच वाहतुकीची कोंडी होते. दौैंड शहरामध्ये तिसरी रेल्वे कुरकुंभ मोरी व्हावी म्हणून तत्कालीन आमदार रमेश थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याकामी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार १४ फेब्रुवारी २0१४ ला कुरकुंभ मोरीच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. साधारणत: फेब्रुवारी २0१५ पर्यंत तिसरी कुरकुंभ मोरी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या कामाला राजकीय ग्रहण लागले आणि कुरकुंभ मोरीचे काम जवळजवळ चार वर्ष रेंगाळले. २0१४ ला सात कोटी रुपयांचा निधी कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आला होता. तर उर्वरित पाच कोटी निधी वैैशिष्ट्यपूर्ण कामासाठी आला होता. दरम्यान सदरचे पाच कोटी रुपये कोठे वापरायचे या कारणास्तव कुरकुंभ मोरीचे काम रेंगाळलेले असल्याचे समजते. पुढे कुरकुंभ मोरीचे काम रेंगाळत गेले. राज्यात आणि तालुक्यात सत्तांतर झाले. परिणामी सदरचे काम रखडले. त्यानंतर आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मोरीच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार २0१७ मध्ये ८ कोटी ४४ लाख रुपये निधी आला. एकंदरीत सर्व निधी रेल्वे खात्याकडे वर्ग करण्यात आला असून, दरम्यान सदरच्या कामाची जबाबदारी रेल्वे खात्याने घेतली आहे.रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेले आहे. कामाला सुरुवातही झाली होती. नगर परिषदेत नागरिक हित संरक्षण मंडळाची एकहाती सत्ता होती. त्यांनी कुरकुंभ मोरीची रक्कम रेल्वे खात्याकडे देण्याकडे टाळाटाळ केली. तत्कालीन नगराध्यक्षा रेल्वे खात्याकडे देण्यात येणाºया धनादेशावर सह्या करीत नाहीत, असे लेखी पत्र तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी मला दिले आहे. केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी कुरकुंभ मोरीचे काम बंद पाडले. कुरकुंभ मोरीचा निधीदेखील अन्यत्र वापरला.- रमेश थोरात, माजी आमदार, दौंडकुरकुंभ मोरीत अडथळा आणला नाहीरेल्वे कुरकुंभ मोरीचे काम सुरू होत आहे. याकामी मला हातभार लावता आला यात मला आनंद आहे. मोरी उभारण्यासाठी सर्वांचे प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हातभार लावले आहेत. मोरीच्या कामात कुठलाही अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. याउलट शेवटच्या टप्प्यातील निधी मिळविण्यासाठी मी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यातील ८ कोटी ४४ लाख रुपये आणण्यासाठी प्रयत्न केले.- राहुल कुल, आमदार, दौैंड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा