शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड गजानन मारणेसह समर्थकांवर हिंजवडीत तिसरा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 10:08 IST

पवना पूल ते चांदणी चौक दरम्यान वाहनचालकांची केली अडवणूक

पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्‍या गुंड गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची तळोजा कारगृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी शेकडो गाड्यांमधून त्याची जंगी मिरवणुक काढली होती. त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोथरुडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बुधवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक आबासो कुंडलिक सुळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पवना पुल ते चांदणी चौक दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ५० ते ९ वाजून २० मिनिटे या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा पवना पूल ते चांदणी चौक या दरम्यान बंगलुरु - मुंबई हायवे रोडने तळोजा कारागृहातून सुटलेला गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरुड) हा त्याच्या पांढर्‍या रंगाच्या गाडीमधून प्रवास करुन त्याने त्याच्या गाडीच्या आजू बाजूला सुमारे १०० ते १५० समर्थकासह ३० ते ३५ चारचाकी गाड्या चालवून, गाड्यांचे बाहेर प्लॅटफार्मवर धोकादायक पद्धतीने उभा राहून, गाड्यांमधून अर्धवट शरीर बाहेर काढून, रस्त्याच्या कडेला होऊन गाड्या थांबवून सार्वजनिक रस्त्याने मुंबईकडून बंगलुरुकडे जाणार्‍या वाहनचालकांना त्यांचा हक्क असताना त्यापासून वंचित ठेवले़ दहशतीच्या जोरावर वंचित ठेवून घोषणाबाजी करुन इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता, वाहनचालकांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण करीत चारचाकी वाहनाने प्रवास करीत असताना दिसून आले. आम्ही वरील वाहनचालकांना थांबवण्याचा इशारा केला असता न थांबता निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने कोथरुडमधील गुन्ह्याबाबत गजानन मारणे याला जामीन मंजूर केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.