शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव ठेवणारच, निर्णय त्यांनी घ्यावा

By admin | Updated: October 5, 2016 01:53 IST

पाणी योजनेतील मीटर योजना पूर्ण झाल्याशिवाय बसवू नका, अशी मागणी होत आहे; पण मीटर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आहे

पुणे : पाणी योजनेतील मीटर योजना पूर्ण झाल्याशिवाय बसवू नका, अशी मागणी होत आहे; पण मीटर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आहे, हे कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे विरोध होत असला, तरी प्रशासन निविदांच्या मान्यतेचा तक्ता स्थायी समितीसमोर ठेवणारच, अशा आग्रही शब्दांत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मीटर आतापासूनच बसविण्याचे समर्थन केले.राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी योजनेतील साठवण टाक्या; तसेच जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच मीटर बसविण्यास सुरुवात करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. महापौर प्रशांत जगताप; तसेच राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही पक्षसंघटनेच्या सुरात सूर मिसळून निविदा प्रक्रिया रद्द करावी, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त म्हणाले, ‘पाण्याचा अपव्यय आताही होतो आहेच. ८५० एमएलडी पाण्यामध्ये संपूर्ण पुणे शहराला २४ तास पाणी देणे शक्य असतानाही आपल्याला १२०० एमएलडी पाणी घ्यावे लागत आहे. इतके पाणी घेऊनही काही जणांना ते मिळते आहे, तर काहींना नाही. हे टाळण्यासाठीच सर्वांना २४ तास पाणी ही योजना आहे व मीटर हा त्यातील अपरिहार्य भाग आहे.’विजेचा वापर आपण मर्यादित करतो, कारण त्याचे बिल येते. तसेच, पाण्याचेही आहे. मीटरबाबत गैरसमज झाले आहेत. हे मीटर अत्याधुनिक आहेत. त्याला १० वर्षांची गँरटी आहे. या कालावधीत मीटरमध्ये काहीही बिघाड झाला, तर ते विनामूल्य बदलून देण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची असल्याचे निविदेतच नमुद करण्यात आले आहे. मीटर बसवण्याचा सर्व खर्च पालिका करणार आहे. मीटरमध्ये कोणी फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची माहिती लगेचच नियंत्रण कक्षाला समजणार आहे. मीटर मोजण्यासाठी कर्मचारी तुमच्याकडे येणार नाही, तर नियंत्रण कक्षातूनच तुमचा वापर किती झाला ते कळेल, असा दावा आयुक्तांनी केला.योजनेला मान्यता दिली गेली त्याचवेळी कामाची मुदत ५ वर्षे असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. साठवण टाक्यांची बांधणी व मीटर हा त्याचा पहिला टप्पा आहे. टाक्यांची निविदा मंजूर झाली. जलवाहिन्या टाकण्याची निविदा प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. प्रशासन आपल्या मतांवर ठाम आहे. त्यामुळे तिसऱ्या वेळी आलेल्या निविदांचा तक्ता मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर नेला जाईल. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे’, असे आयुक्त म्हणाले.