शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बसशेड नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:10 IST

वानवडी : वानवडी परिसरातील बसमार्गावर बहुतेक ठिकाणी बसथांब्यांच्या सोयी नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उन्हात बसची वाट पाहत उभे राहावे ...

वानवडी : वानवडी परिसरातील बसमार्गावर बहुतेक ठिकाणी बसथांब्यांच्या सोयी नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उन्हात बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, शेड उभा करण्याची मागणी होत आहे.

शिवरकर मार्गावरील जांभुळकर चौक, जगताप चौक, संविधान चौक, एबीसी फार्म चौक तसेच साळुंखे विहार रस्त्यावरील कमेला, स्लाटर हाऊस, बधाई स्वीट, इंदिरा वसाहत अशा ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूला प्रवासी बसशेड नाहीत. बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांच्या गैरसोयीचा फटका पीएमपीएलला बसत आहे. बसची वाट पाहात उन-पावसात उभे राहण्यापेक्षा काही प्रवासी रिक्षाने जाणे पसंद करत आहेत. त्यातूनच रिक्षावाले आपली रिक्षा या ठिकाणी लावून आसनावर भाडे स्वीकारत आहेत.

संविधान चौक तसेच जगताप चौकातील बसथांबा शेड काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले, परंतु अद्याप या ठिकाणी नवीन बसथांबे बसविण्यात आलेले नाहीत. फातिमानगर येथील बसथांब्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांसाठी धोकादायक झाले आहे.

एकीकडे प्रवासी वाढवण्यासाठी पीएमपीएल वेगवेगळ्या उपाय योजना राबवत आहेत, परंतु अशा प्रकारच्या गैरसोयींकडे बस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबतची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

----------------------

संविधान चौक येथील बसथांब्यावर बसण्यासाठी शेड नसल्याने रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे या बसथाब्यावर बसशेडची व्यवस्था असली पाहिजे.

-जेष्ठ नागरिक, बस प्रवासी

-----------------

वानवडी परिसरातील दुरावस्था झालेले बसशेड काढण्यात येतील. बसशेड साठी मनपा सदस्य, आमादार, खासदार फंडामधून तसेच महानगरपालीके मार्फत स्मार्टशेड बसून मिळाल्यास परिवहन महामंडळाला त्याचा उपयोग होईल. पीएमपीएल कडून बसशेड उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत.

-- दत्तात्रय तळपुळे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य, पीएमपीएल

-----------------------------

खाजगी जाहिरात ठेकेदारांच्या मार्फत बसशेड लावण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. १० एप्रिलपुर्वी जगताप व संविधान चौकातील प्रवाशी बसशेड लावण्यात येतील. एबीसी फार्म चौकात महापौर असताना निधी उपलब्ध करुन प्रवासी बसशेड लावण्यात आला आहे, प्रवाशांनी त्याचा वापर करावा. तसेच साळुंखे विहार रस्त्यावर प्रवासी बसशेड नसलेल्या कमेलिया व इंदिरा वसाहत येथे बसशेड लावण्यासाठी पत्र देण्यात येईल.

- - प्रशांत जगताप, नगरसेवक

-----------------

फोटो 140247 : संविधान चौकात प्रवासी बसशेड नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय.

फोटो 150944 : एबीसी फार्म चौकात छोट्या झाडाचा अडोसा घेत उभे असलेले प्रवाशी.

फोटो 134553 : फातिमानगर चौकातील धोकादायक झालेले बसशेड.