शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

... तर वाहनांना जॅमर

By admin | Updated: July 14, 2016 00:31 IST

येथील महापालिका भवनात वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य मार्गावरच वाहने लावतात. महापालिकेसमोर वाहन उभे केल्यास जॅमर लावला जाऊ शकतो.

पिंपरी : येथील महापालिका भवनात वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य मार्गावरच वाहने लावतात. महापालिकेसमोर वाहन उभे केल्यास जॅमर लावला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने उभी करायची कोठे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.शासकीय कार्यालयात वाहतळाची सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास होतो. पैसा आणि वेळेचा अपव्यय होतो. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. महापालिकेसह शहरातील महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी, तहसीलदार अशा विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली होती. बेस्ट सिटीतील महापालिकेचे वाहनतळ हे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांना अपुरे पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुणे-मुंबई रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. तसेच महापालिकेतून बाहेर पडण्याच्या मार्गावरही वाहने उभी केली जातात. याबाबतच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, महापालिकेकडे असणारी वाहनतळाची सुविधा अपुरी असल्याची कबुलीही महापालिका अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच विस्तारित इमारतीत याबाबत विचार केला जाईल, असे महापालिकेचे म्हणणे होते. दरम्यान, महापालिका भवनासमोरील रस्त्यावर दररोज शंभर ते दीडशे वाहने धोकादायकपणे उभ्या करीत असल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले होते. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, याबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली. भवनासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंस नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली.(प्रतिनिधी)