शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युवकांमध्ये वाढताेय ह्रदयविकारांचा धाेका! 'ही' लक्षणे असतील तर काळजी घ्या

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: December 1, 2023 18:55 IST

दरवर्षी जवळपास ५८ लाख व्यक्ती असंसर्गजन्य आजारांमुळे आपला जीव गमावतात....

पुणे : कोलेस्टेरॉल, रक्तदाबामध्ये वाढ, व मधुमेहासह इतर अनेक, जीवनशैलीमुळे होणारे आजार सध्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे (सीव्हीडी) मोठे कारण बनत आहेत. याशिवाय मानसिक तणाव, धूम्रपानासारख्या चुकीच्या सवयी आणि अतिरिक्त व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका आणि ह्रदयांच्या रक्तवाहिन्यांचे आजार (सीएडी) सारख्या हृदयविकाराच्या समस्यांची शक्यता वाढते, विशेषत: तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

पन्नास ते साठ वर्षांपूर्वी आपल्याकडे सर्वाधिक मृत्यू हे टीबी, काॅलरा, देवी आदी संसर्गजन्य आजारांमुळे हाेत. याचे कारण हे अस्वच्छता, जनजागृतीचा अभाव असे. पण आता त्याबाबत जनजागृती झाली आणि हे मृत्यू अत्यल्पावर आले. परंतू, आता देशात सर्वात जास्त मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे नाही, तर मधुमेह, ह्रदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होताना दिसून येत आहे. दरवर्षी जवळपास ५८ लाख व्यक्ती असंसर्गजन्य आजारांमुळे आपला जीव गमावतात.

याची लक्षणे ओळखा :

- छातीत तीव्र वेदना, हात, जबडा, पाठ आणि मानेपर्यंत पसरणारी वेदना, धाप लागणे ही हृदयविकाराची काही लक्षणे आहेत.

- 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ छातीत दुखत असताना घाम येणे हा तर हृदयविकाराचा झटका मानला जातो.- तीव्र ढेकर आणि त्यासोबत पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे हे देखील काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते.

- काही लोकांनामध्ये सिंकोप स्ट्रोक (थोड्या कालावधीसाठी शुद्ध हरपणे) किंवा अचानक हृदयाचे कार्य बंद होण्याची शक्यता देखील दिसून येते.

- हृदयरोगाचा इशारा देणाऱ्या सर्व लक्षणांबाबत जागरूक राहावे.

- या आजाराचे लवकरात लवकर निदान होणे खूप महत्त्वाचे आहे.

काय आहे उपाय

- ह्रदयविकारात औषधोपचार व्यतिरिक्त कोरोनरी अँजिओप्लास्टी करावी.- हृदयातील ज्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत त्या मध्ये बायोरिसॉर्बेबल स्टेन्टचे इम्प्लांटेशन केले जाते.

- हे स्टेंट कालांतराने विरघळतात आणि त्यामुळे धमन्या त्यांच्या सामान्य कार्य आणि आकारात परत येतात.

ह्रदयविकारासह इतर सर्व असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमध्ये बदल करावेत. हे बदल खूपच सहज सोपे असतात. हृदय आणि एकंदरीत शरीराचे आरोग्य जपण्यामध्ये या जीवनशैलीतील बदलांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

- डॉ अभय सोमाणी, ह्रदयराेगतज्ज्ञ

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाPuneपुणे