शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्तांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी; मेधा पाटकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 17:05 IST

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे. भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न आहे तसेच असून, त्यांना जाणीवपूर्वक परीघाबाहेर ठेवले जात आहे. मूलभूत गरजांपासून भटक्या विमुक्तांना वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी आहे, असा आरोप जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी केला.

निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटके विमुक्त महिला हक्क परिषदेचे उदघाटन मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पाटकर बोलत होत्या. 

पाटकर म्हणाल्या,  समाजाच्या बाहेर ठेवणं, परिघावर ठेवणं, गुन्हेगार ठरवणं हे भटके विमुक्तांवर ऐतिहासिक अन्याय झाले आहेत, त्यांची स्थिती ही हत्या भोगणारी परिस्थिती आहे. राज्यघटनेतील समता, न्याय, स्वातंत्र्य हे हक्क नाकारले जात आहेत. समाजामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे वंचित, शोषित, पीडित आणि जाणीवपूर्वक वगळलेले असल्याचे दिसते. राज्यघटनेनुसार भटक्या विमुक्तांना समान हक्क देण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. आपल्या हक्कांसाठी दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना लढावे लागत आहे. हात जोडून भीक मागण्यांसाठी नाही तर मूठ आवळून हक्क मिळवण्यासाठी भटके विमुक्तांचा लढा हा माणूस म्हणून जगण्यासाठी असायला हवा. हा लढा स्वबळाच्या आधारावर पुढे नेला पाहिजे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर पारधी समाजाच्या लोकांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे गुन्हेगार जमात असा शिक्का असल्याने त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना अजूनही आहे. ती काढून टाकणे हा अस्मितेचा प्रश्न आहे. भटक्या विमुक्तांना परीघाबाहेर ठेवण्याचे काम केले जात आहे. भटक्या विमुक्तांच्या शिफारसीचे काय झाले याविषयी माहिती अधिकारातून माहिती मिळविण्याची गरज आहे. भटक्या विमुक्तांना मूलभूत सुविधांपासून दूर ठेवणारा समाज आणि शासन हेच खरे अपराधी आहेत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSocialसामाजिकGovernmentसरकारReligious programmeधार्मिक कार्यक्रम