शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:08 IST

बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवारी ३६४ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६६४ वर पोहोचली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात दोन दिवस पालखी सोहळा असल्याने लाखोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले होते. यामुळे पालखीनंतर रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे.

शहरात गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ५० पेक्षाही खाली आली होती. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन बाधितांची आकडेवारी जाहीर करणेही थांबवले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.गुरुवारी शहरात ३६४ नवीन बाधितांची नोंद झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे असल्याने, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. सध्या एका रुग्णाला ‘नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलटर’वर ठेवण्यात आले आहे, तर दोघांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. हे सर्व रुग्ण हे अन्य सहव्याधीग्रस्त आहेत.

दरम्यान, कोरोना संसर्गाचे सौम्य स्वरूप आणि शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसून येत असली तरी, सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल