शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

By नम्रता फडणीस | Updated: September 13, 2022 17:07 IST

पुढील वर्षी मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू

पुणे: यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला विलंब लागल्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. पुढील वर्षात पथकांची संख्या कमी करता येईल का? किंवा पथकातील वादकांच्या संख्येबाबत मर्यादा असावी का? याचा विचार केला जाईल. दुस-याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. आमच्याकडून ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या त्या गोष्टी करुन पुढच्या वर्षीची मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू असेआश्वासन मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिले.

यंदाच्या वर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल 10 तासापेक्षा अधिक कालावधीपर्यंत चालल्याने विसर्जन सोहळा संपण्यास विलंब लागला, त्याविषयी बोलताना नितीन पंडित म्हणाले, यंदाच्या वर्षी मिरवणुकीला उशीर होण्यास अनेक कारणे आहेत. दोन वर्षाच्या  कोरोना महामारी नंतर उत्सव साजरा होत असल्याने भाविकांच्या भावना उर्त्स्फूत होत्या व मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी खूप असल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. मिरवणूकसुरळीत पार पाडणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पुढील रुपरेषा ठरवणार आहोत.

दरम्यान,  लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामाध्यमातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपली असून हा जय पराजय नाही, तर सक्षम व्यवस्थेवर विश्वास आहे, हे सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या श्रद्धेचा हा विजय आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक २४ तास चालते, या आरोपात काही तथ्य नाही. मानाचे गणपती इतर मंडळांना तुच्छतेची वागणूकदेतात, पोलीसांवर दबाव आणतात या गोष्टींना कुठलाही आधार नाही. ऐन गणेशोत्सवात न्यायालयात खेटे मारणे हे कार्यकर्ता म्हणून अत्यंत दुर्दैवी आहे. मुळातच याचिकाकर्त्या मंडळाने आम्हाला किंवा पोलीस प्रशासनाशी याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. आमच्या हातात थेट नोटीसा पडल्या.  पुढीलवर्षी परंपरा अबाधित ठेवून परिवर्तनाची कास धरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे पदाधिका-यांनी सांगितले.

यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे ॠग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवlakshmi roadलक्ष्मी रोड