शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक होणार..! युद्धविरामामुळे महापालिका इच्छुकांचा जीव भांड्यात

By राजू इनामदार | Updated: May 10, 2025 19:13 IST

- न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार  

पुणे : भारत पाकिस्तानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली. ती अशीच सुरू झाल्यास महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जातील म्हणून धास्तावलेल्या इच्छुकांचा जीव युद्धविराम झाल्यामुळे भांड्यात पडला आहे. आता निवडणुका नक्की होतील, असा विश्वास त्यांच्यामध्ये व्यक्त होत आहे.सलग ३ वर्षे पुण्यातील, तर राज्यातील अन्य शहरांमध्ये तब्बल ५ वर्षे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. पुणे महापालिकेची निवडणूकही सलग ३ वर्षे झालेली नाही. सगळीकडे प्रशासकीय राज आहे. त्यामुळे स्थानिक स्वरावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या आकांक्षांवर पाणी पडले होते. राज्य सरकार किंवा अन्य पक्षांचे राज्यस्तरीय नेतेही याबाबतीत निवांत झाले होते. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक झाली, महापालिका निवडणूक झाली. त्यात याच स्थानिक कार्यकर्त्यांनी काम केले, त्यानंतर निवडून आलेले खासदार व आमदारही महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काहीच हालचाल करायला तयार नव्हते.इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका न्यायालयीन याचिकांमध्ये अडकल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयानेच सरकारला ताशेरे मारत इतर मागासर्वीयांची गणना झाली नसेल तर जुन्या म्हणजे वर्ष २०२२ मध्ये झालेल्या गणनेवर आधारित आरक्षण निश्चित करून निवडणूक घ्या, असे आदेश दिले आहेत. त्याचा आनंद इच्छुक व्यक्त करत असतानाच भारत पाकिस्तानमध्ये जवळपास युद्धच सुरू झाले. ते बराच काळ सुरू राहील अशा शक्यता निर्माण झाली. त्यामुळेच अशा काळात निवडणुका घेतल्या जाणे शक्य नाही, असे इच्छुकांना वाटत होते; पण आता युद्धविराम झाल्यामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.पुणे महापालिकेच्या नगरसेवकपदाच्या जागा १६६ आहेत; मात्र या १६६ जागांसाठीच्या इच्छुकांची सर्वपक्षीय संख्याच जवळपास दोन हजारांच्या आसपास असेल असा अंदाज आहे. त्यापैकी अनेकजण मागील ३ वर्षांपासून मतदारांसमोर राहण्यासाठी म्हणून पदरचा खर्च करत आहेत. त्यात मतदारांना देवदर्शन सहली, दिवाळीचा फराळ वाटप अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींना आता पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024