शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

थोपटेवाडीतील आगीत २१ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 20, 2014 04:40 IST

पानशेत रस्त्यावरील थोपटेवाडी येथे रविवारी रात्री घरांना लागलेल्या आगीत तिन्ही घरांचे जवळपास २१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले

खडकवासला : पानशेत रस्त्यावरील थोपटेवाडी येथे रविवारी रात्री घरांना लागलेल्या आगीत तिन्ही घरांचे जवळपास २१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, आज मंडल अधिकारी व तलाठी यांनी नुकसानाचे पंचनामे केले. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. घेरा सिंहगड हद्दितील थोपटेवाडी येथे रविवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली होती. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र या तीनही घरांचे नुकसान वाचविण्यात अपयश आले. तर घरातील एक युवकही जखमीही झाला होता. खडकवासला मंडल अधिकारी एस. जी. जगताप, तलाठी एम. एस. गोगावले, सुभाष सपकाळ व ओम शिर्के यांनी संबधीत जळीतग्रस्त घरांची पाहणी करुन पंचनामे केले. तीनही घरांचे मिळुन एकवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या पंचनाम्यात स्पष्ट झाले. तांदुळ, तयार भात पिक, ज्वारी अशा धान्याबरोबरच, भांडी, फर्निचर, शेतीची औजारे व कपड्यांचा यात समावेश होतो. घरातील सामान हलविताना गणेश दत्तु थोपटे (वय ३५ ) हा भाजल्याने जखमी झाला असून त्याचेवर पुणे येथे उपचार सुरु आहेत. तीनही कुटुंबाना तातडीची मदत म्हणुन जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पारगे तर सरपंच गुलाब थोपटे यांनी आर्थिक मदत केली. सकाळी आमदार भिमराव तापकीर यांनी हवेलीचे तहसिलदारांशी संपर्क साधुन या बाबत संबधीतांना योग्य मदतीबाबत महसुल खात्याने आवश्यक मदत करण्याबात सुचना केली. (वार्ताहर)