कामशेत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे वाढत्या महागाईविरोधात थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. कामशेत रेल्वे स्टेशनपासून निघालेल्या या हल्लाबोल मोर्चामध्ये महिलावर्ग हातामध्ये थाळ्या वाजवत महागाईविरोधात घोषणा देत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.कार्यकर्ते राज्य शासनाच्या विरोधामध्ये ‘या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. या मोर्चाचे रूपांतर मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोकोमध्ये करण्यात झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरले .शेतकरी आत्महत्या करत असून डाळी व जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्राणावर वाढल्याने सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. जर पुढच्या काही दिवसामध्ये शासनाने महागाई विरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही आणखी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे , आमदार निरंजन डावखरे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, राजेंद्र कोरेकर,वैशाली नागवडे, गणेश खाडगे, विठ्ठल शिंदे,अंकुश आंबेकर,दीपक हुलावळे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे अतिश परदेशी, संतोष भेगडे, गंगा कोकरे, गणेश काकडे,माधोबा कालेकर,मधुकर कंद,सचिन घोटकुले, सुभाष जाधव, मंगेश ढोरे,तान्हाजी दाभाडे, संतोष राक्षे, नीलेश दाभाडे,तानाजी पडवळ, विलास राऊत,उत्तम घोटकुले आदी उपस्थित होते .या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले. (वार्तांहर)
महागाईविरोधात थाळीनाद, रास्ता रोको
By admin | Updated: October 26, 2015 01:39 IST