शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रुप पालटलं आणि ठाकरवाडी आनंदानं उजळून निघाली..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:45 IST

हाती घेतलेल्या मोहिमेमुळे काही दिवसांतच वस्तीचा कायापालट केला.

ठळक मुद्दे सुमारे ५० घरांची आदिवासी लोकवस्ती शंभर टक्के सौर ऊर्जेवर

चासकमान: कान्हेवाडी बुद्रुक(ता.खेड) येथे येथील ठाकरवाडीतील आदिवासी बांधवांच्या जीवनातील मरगळ दूर करण्यासाठी डॉ. माधव साठे यांनी वस्तीतील घरांना रंग देऊन कायापालट करण्याच्या संकल्पाकडे एक पाऊल टाकले. एखाद्या नववधूसारखी दिसणारी घरे पाहून आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप बोलका होता. हे अतिशय  सुंदर काम डॉ. माधव साठे व मुंबईच्या माता बाल संगोपन संस्था कंपनी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. तसेच कान्हेवाडी बुद्रुक हे गाव लोकसहभागातून  संपूर्ण सौर ऊर्जेवर चालत असून देशातील पहिली सोलर आदिवासी वस्ती म्हणून कान्हेवाडी येथील वरची ठाकरवाडी ठरली.ठाकरवाडीतील आदिवासी बांधवाची घरे १००% सोलर झाली आहे. या कामासाठी थेमिस कंपनी व चंद्रकांत गेणभाऊ सहाणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.  सुमारे ५० घरांची आदिवासी लोकवस्ती शंभर टक्के सौर ऊर्जेवर करण्यात आली. अद्याप रस्ते,पाणी, वीज, अशा मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावाला मुंबई माता बाल संगोपन संस्थेचा सेक्रेटरी डॉ माधव साठे यांनी भेट देऊन या संस्थेने गावाचे रुप पालटण्यासाठी विचार सुरू केला. मग हाती घेतलेल्या मोहिमेमुळे काही दिवसांतच वस्तीचा कायापालट केला. कान्हेवाडी बुद्रुक गावातील नागरिकांबरोबर विचारविनिमय केल्यानंतर संपूर्ण गाव सोलर वर आधारित करण्याचा निर्धार के ला.थेमीस मेडिकल कंपनीसमोर हा विचार मांडला आणि त्यांनी त्यांच्या सीएसफंडातून हे काम करण्याची  तयारी दर्शविली . प्रथम येथील लोकांची पाण्याची अडचण सोडविण्याचा विचार करून ग्रामस्थांनी विहीर बांधली व मुंबई माता बाल संगोपन संस्थेने पाण्याचे नळ आणि टाक्या उपलब्ध करून दिल्या.व ग्रामस्थांनी श्रमदानाने पाईप लाईनची जोडणी करून टाक्या बसविल्या. ठाकरवाडीतील शाळा ई- लर्निंगच्या माध्यमातून डिजिटल झाली आहे. शाळेलाही ग्रामसहभागातून सोलर पॅनल मिळाले आहे. गावातील रस्त्यावरील सोलर दिवे हे रोटरी क्लबच्या  माध्यमातून देण्यात आले आहे.यावेळी डॉ माधवराव साठे, स्वाती शिंदे, सरपंच गंगुबाई आंबेकर, उपसरपंच मारुती सहाणे, ग्रामसेवक निलेश पांडे, उद्योजक चंद्रकांत सहाणे, दत्तात्रय कोबल, हर्षद कोबल, राहुल सहाणे, दिपक कोबल,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान सहाणे यांनी केले.

टॅग्स :Khedखेड