शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हिरडा खरेदी केंद्राकडे पाठ आदिवासी शेतकऱ्यांचीपाठ

By admin | Updated: May 27, 2017 01:26 IST

हिरड्याच्या खरेदीस एकाधिकार योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या ऐच्छिक खरेदीखाली आणल्यापासून आदिवासींच्या

कांताराम भवारी लोकमत न्यूज नेटवर्कडिंभे : हिरड्याच्या खरेदीस एकाधिकार योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या ऐच्छिक खरेदीखाली आणल्यापासून आदिवासींच्या हिरडा खरेदीकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यंदा हिरड्याचा हंगाम सुरू झाला असून महामंडळाच्या खरेदी केंद्रावर अत्यल्प हिरडा खरेदी झाला आहे. आदिवासी महामंडळाकडून हिरडा खरेदीसाठी जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यासह अकोले तालुक्यात एकूण २२ केंद्रे सुरू केली आहेत. मात्र खरदी केंद्रावर हिरडाविक्री करताना घातली जाणारी सातबाराची अट व आठवड्यातून केवळ एकच दिवस ही केंद्रे सुरू ठेवली जात आहेत. आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन असणारा ‘हिरडा’ शासनाच्या ऐच्छिक खरेदी योजनेत अडकला आहे. सन २०१२-२०१३ पासून हिरडा खरेदीची एकाधिकार योजना बंद झाली. यामुळे पुन्हा एकदा खासगी व्यापाऱ्यांची लुडबुड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या हिरडा हंगामात महामंडळाने आंबेगाव व खेड तालुक्यात तळेघर, अडिवरे, जांभोरी, तिरपाड, डेहणे, मंदोशी, टोकावडे, आंबे, पारगाव तर्फे मढ, जांभुळशी, चिखली तर अकोले तालुक्यात कोतुळ, समशेरपूर, खडकी, धामनवन, देशमुखवाडी, वाकी, वारंघुशी, पळसुंडे, फोफसंडी, विहीर, मुतखेल, शिरपुंजे व खिरविरे आदी ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र या खरेदी केंद्रावरील हिरडा खरेदीचा आढावा घेतला असता यंदा आंबेगाव खेड तालुक्यातील डेहणे व तळेघर या दोनच केंद्रांवर केवळ ०.३६.५० एवढा तर अकोले राजुर येथील खरेदी केंद्रावर १,८५ एवढा हिरडा खरेदी झाला आहे. महामंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसारमहामंडळाच्या खरेदी केंद्रावर १ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ अखेरपर्यंत केवळ १६५२० एवढ्याच किमतीचा हिरडा खरेदी झाला आहे. सध्या हिरड्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असूनही महामंडळाची वरील आकडेवरी पाहता शेतकऱ्यांनी महामंडळाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पारंपरिक भात, नागली, सावा, वरई या पिकांबरोबरच आदिवासी शेतकऱ्यांकडून पैसा-आडक्यासाठी मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. यापूर्वी हिरडा व आदिवासी शेतकऱ्यांचा शेत व जंगलमाल हा एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केला जात होता. हिरडा खरेदीतून महामंडळाने आदिवासी शेतकऱ्यांनाहक्काचे उत्पन्न मिळवून दिले होते. हिरडा विक्रीतून महामंडळालाही चांगला फायदा झाला होता. पेसा कायद्यान्वये जंगम माल व गौणवनउपज मिळविण्याचे अधिकार आदिवासींना देण्यात आले आहेत. हिरडा खरेदीत घातलेली सातबाराची अट जाचक असून एक प्रकारे आदिवासी शेतकऱ्यांवर अविश्वास दाखविण्यासारखी आहे. यामुळे हिरडा उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. पूर्वीप्रमाणे एकाधिकार खरेदी योजना लागू करून आदिवासी महामंडळामार्फतच आदिवासींचा हिरडा खरेदी करावा.- सीताराम जोशी, पेसा कायदा अभ्यासक हिरडा खरेदीसाठी यंदा महामंडळाची एकूण २२ खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. बाळहिरड्याला सध्या ८० प्रतिकिलोने दर दिला जात आहे. खासगी व्यापारी याहीपेक्षा जास्तीच्या दराने हिरडा खरेदी करीत आहेत. ऐच्छिक खरेदी योजनेमुळे व्यापाऱ्यांना प्रतिबंध करता येत नाही. शेतकऱ्यांना परवडेल तेथे माल विकण्याची मुभा आहे.- भाऊसाहेब शेजूळ, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, जुन्नर