शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक पुण्यावर दहशतवाद्यांचा डोळा, पुणे कनेक्शन पुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:22 IST

शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत जेवढ्या वेगाने झाला, त्याच वेगाने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देश-परदेशातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रोजगारासाठीही येतात.

पुणे : शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत जेवढ्या वेगाने झाला, त्याच वेगाने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देश-परदेशातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रोजगारासाठीही येतात. काही वर्षांत पुणे शहर हे दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशविघातक शक्तीसाठी एक केंद्र बनत गेले आहे़याअगोदर पाकिस्तानच्या आयएसआय, इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी संपर्कात असलेल्यांचे जाळे शहरात असल्याचे विविध कारवायांतून स्पष्ट झाले होते़ एटीएसने अल् कायदाशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले़ बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या एबीटी या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे़>पुण्यात आश्रयपुणे व देशभरात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत कोंढव्यातील मोहसीन चौधरी याचा एटीएस अद्याप तपास करीत आहे. या दहशतवाद्यांबरोबरच नक्षलवादी कारवायांना पुणे शहरात आश्रय मिळत असल्याचेही समोर आले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ़ सत्यपाल सिंह यांनी शहरात नक्षलवाद्यांचे स्लिपर सेल कार्यरत असल्याकडे लक्ष वेधले होते़ शहरालगतच्या गावांमधून नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्यांना एटीएसने यापूर्वी पकडले होते़ पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा अबाधित ठेवायची असल्यास दहशतवाद्यांना पाठबळ देणाºयांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान तपास यंत्रणेपुढे आहे़, हेच या बांगलादेशींच्या घुसखोरीवरूनस्पष्ट होत आहे.>स्फोटाने शहर हादरलेत्यानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने सर्वांना हादरवून सोडले़ १३ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात १७ जणांना जीव गमवावा लागला़ ५३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले़ या बॉम्बस्फोटाचे कनेक्शन अगदी मराठवाड्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले़ या बॉम्बस्फोटात रियाज भटकळ, यासिन भटकळ यांचा हात असल्याचे उघड झाले़ मोहसिन बेग याला या प्रकरणात शिक्षा झाली़ त्यानंतर जंगली महाराज रोडवर एकाच वेळी काही अंतरावर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले़ त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट करुन पुन्हा एकदा पुणे हे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याचे दिसून आले़ दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन वारंवार उघड झाले आहे़>शांत शहर म्हणून होता पुण्याचा लौकिकबाबरी मशीद पडल्यानंतर अनेक ठिकाणी दंगली झाल्या;पण पुणे शांत राहिले़ तेव्हापासून शांत शहर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. मात्र, त्याला पहिला तडाखा गेला तो २००८ मध्ये़ पुणे शहर व परिसरात अनेक परप्रांतीय रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत़ अगदी बांगलादेशीयांची संख्या लक्षणीय आहे़ त्यातूनच मग दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक असलेली सुपीक जमीन येथे तयार झाली़ त्यातूनच सिमी, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांची पाळेमुळे पद्धतशीरपणे रोवली़ सुमारे दहा वर्षांपूर्वी देशभरातील अनेक शहरांत बॉम्बस्फोट झाले़ त्याची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने ई-मेल पाठवून घेतली होती़ मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राकेश मारिया यांनी २००८ मध्ये पुण्यातील कोंढवा भागातील अशोक म्युझ या सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकून काही तरुणांना पकडले होते़ या फ्लॅटवर मीडिया सेल स्थापन करुन त्याद्वारे देशभरातील तरुणांची माथी भडकविण्याचे काम केले जात होते़ देशभरात होत असलेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड रियाझ भटकळ असल्याचे व त्याचा वावर पुण्यात असल्याचे त्या वेळी उघड झाले होते़>बांगलादेशींचे आव्हानयापूर्वी बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रकरणात असंख्य बांगलादेशी देशभरात आढळून आले आहेत़ त्यांच्यामार्फत बनावट नोटांचा देशात सुळसुळाट वाढला होता़ शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीतही त्यांचा काही प्रमाणात हात दिसून आला़ पण, पुण्यात दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी गुंतल्याचे प्रथमच पुढे आलेआहे़ त्यामुळे आता हे आव्हानही वाढले आहे़