शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

दहा वर्षे टोलवसुली; पण रस्ता असुरक्षित!

By admin | Updated: March 16, 2017 02:01 IST

गेल्या आठवड्यात उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातस्थळी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ््या नव्हत्या. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आलेच

तुळशीराम घुसाळकर , लोणी काळभोरगेल्या आठवड्यात उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातस्थळी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ््या नव्हत्या. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आलेच नसते व ११ निरपराध्यांचा बळी गेला नसता. दुभाजकाची उंची जास्त असती तर यातील काहींचे प्राण वाचले असते. यामुळे ‘लोकमत’ने कवडीपाट ते यवतदरम्यान केलेल्या पाहणीत गेली दहा वर्षे येथे टोलवसुली सुरू आहे, मात्र रस्ता असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले आहे. परंतु प्रवाशांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या नाहीत. आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले आहे. या सत्तावीस किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सन २००४ पासून या कंपनीने टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. शासनाने या कंपनीला १९ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी दिली आहे. महिलांसाठी एकही शौचालय नाही. पुरुषांसाठी एक शौचालय आहे; परंतु त्याचे पाणी टोलनाक्याशेजारी तेथेच रस्त्याच्या कडेला सोडले आहे. महिला प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते. कंपनीने जेथे लोकवस्ती आहे; त्यापैकी काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार केले आहेत. खोलेवस्ती येथून लोणी काळभोर गावात येणाऱ्या पुलाखाली प्रचंड घाण पडलेली असते. कुत्री, डुकरे तेथे कायम असतात. महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको, म्हणून महिला, शाळेतील मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु प्रचंड दुर्गंधी व कुत्रे, डुकरांच्या तावडीतून सुटका करून त्यांना प्रवास करावा लागतो. कंपनी सहा महिने किंवा वर्षातून एकदा या रस्त्याची जेसीबी मशीन लावून स्वच्छता करते. कदमवस्तीसमोर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे एक गेट आहे. या गेटसमोरील सर्व्हिस रोडवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी कंपनीत जाणारे व येणारे टँकर उभे असतात. तेथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक विद्युत रोहित्र आहे. याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. अधूनमधून हा कचरा पेटवला जातो, तो दिवसभर पेटत राहतो. या आगीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूकवेळी ही वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून दुचाकी वाहने घसरतात. कधी कधी हात-पाय मोडण्यावर भागते, तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो. सन २००४ मध्ये चारपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे. तसेच त्याखालचा फुटपाथही आपोआपच तुटला आहे.