शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दहा जणांच्या टोळक्याने केली मारहाण, अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:18 IST

आंदोलन केले म्हणून मारहाण झाल्याची तक्रार एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने गुरुवारी (दि.२८) चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.

चाकण : आंदोलन केले म्हणून मारहाण झाल्याची तक्रार एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने गुरुवारी (दि.२८) चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. संबंधित पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी दहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार एस आर हरगुडे यांनी दिली. दरम्यान संबंधित घटनेबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला असून मारहाणीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यात आला असला तरी सदरच्या मारहाण नाट्याची खातरजमा करून घेण्याचे प्रयत्न चाकण पोलिसांनी सुरु केले आहेत.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश गोपीनाथ शिंदे ( वय ३२ वर्षे, रा.वाकी खुर्द, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार खेड व चाकण परीसरात सामाजिक कार्य करत असतो. गुरुवारी (दि.२८) सकाळी पावणे बाराच्या  सुमारास चाकणच्या तळेगाव चौक येथील कामगार नाक्यावर कामगारांच्या समवेत बोलत असताना तोंडाला रुमाल बांधलेले ९ ते १० जण हातात काठ्या व गज घेवुन आले. त्यातील एकाने दम दिला कि, ‘तु उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खेड यांचे ऑफिसवर मोर्चा का काढला, व तु अवैध्य धंदयाबाबत तक्रार का दिली व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार का केलीस?’ असे म्हणून मारहाण केली. पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र संबंधित घटनेची खातरजमा करण्यात येणार असल्याचे सांगत पोलिसांनी या मारहाणीच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.