शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

दहा मिनिटांचा प्रवास तासावर, खडकी-बोपोडी रस्ता, प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचा होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:39 IST

पिंपरी-चिंचवडमधून सुखकर प्रवास करून पुणे महापालिका हद्दीची चाहूल लागताच सुरू होतोय जिवावर बेतणारा प्रवास. निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपासून सकाळ-संध्याकाळ खडकी स्टेशनपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मागील अनेक वर्षांपासून या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

 खडकी : पिंपरी-चिंचवडमधून सुखकर प्रवास करून पुणे महापालिका हद्दीची चाहूल लागताच सुरू होतोय जिवावर बेतणारा प्रवास. निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपासून सकाळ-संध्याकाळ खडकी स्टेशनपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मागील अनेक वर्षांपासून या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त झाले असून, दहा मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे दोन-दोन तास या वाहतूककोंडीत अडकून पडत कित्येकदा तर याच ठिकाणी खासदार, मंत्री यांनासुद्धा वाहतूककोंडीचा फटका बसला.महापालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी त्या वेळेस तत्परता दाखवून काही दिवसांनी पुन्हा तीच अवस्था या ठिकाणची आहे. वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास पोलीस आणि महापालिका प्रशासन कमजोर पडत आहे. कधी एकदाची या समस्येमधून सुटका होईल असा प्रश्न या ठिकाणावरून वर्षानुवर्षे प्रवास करणाºया वाहनचालकांनी केला आहे.रहिवाशांना भाडेकरूंना प्रशासनाने घरे देऊनही काही रहिवासी त्या ठिकाणीच राहतात. त्यांच्या मागण्या प्रशासनाला मान्य नसल्यामुळे या वस्तीमुळेच या चौकात वाहतूककोंडी होत आहे. बोपोडीत अनेक नेत्यांनी या वस्तीमधील रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. जोपर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारी ही घरे काढणार नाही, तोपर्यंत तरी येथील समस्या सुटू शकत नाही.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी रेल्वे क्रॉसिंग ते अंडी उबवणी केंद्र चौक हा दीड किलोमीटरचा रस्ता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधून जातो. कॅन्टोन्मेंट आणि केंद्र सरकारच्या ब्रिटिशकालीन कायद्यामुळे या दीड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत खडकी पोलीस ठाणे चौकात उड्डाणपूल व सर्वत्र विहार चौकात महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग व बोपोडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर उड्डाणपूल तयार करून घ्यावा, अशी मागणी खडकी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केली आहे. तसा प्रस्ताव ही बोर्डाच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडून महापालिकेकडे देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी सांगितले होते. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या इमारती पोस्ट आॅफिस कार्यालय, जयहिंद टॉकीज, खडकी स्टेशनसमोरील काही हॉटेल रुंदीकरणामध्ये जाण्याची शक्यता आहे.ही आहेत कोंडीची कारणे...निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपर्यंत अगदी आरामात जाता येते. मात्र सीएमई, दापोडीपासून अगदी संथ गतीने वाहतूक सुरूअसते. हॅरिस पुलावर व बोपोडी सिग्नलच्या थोड्या अलीकडे जुनी वस्ती आहे. ती वस्ती रस्त्याच्या मध्ये येत असल्यामुळेच सिग्नलच्या दोनशे मीटर अलीकडूनच रस्ता छोटा झाल्यामुळे भर चौकात वाहतूक अडकून पडते. तसेच बोपोडी गावामधून येणारी वाहने नो एन्ट्री असूनही पोलिसांसमोरून बिनदिक्कत येतात. खडकी बाजाराकडून व भाऊ पाटील रस्त्याने नो एंट्रीमधून वाहने येऊन बोपोडी चौकात थबकतात. चारही बाजूंनी चौकात वाहने येत असल्याने नियोजनाअभावी वाहतुकीचा भर चौकातच खेळखंडोबा होतो. योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. परंतु, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बोपोडीमधील वाहतूक समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. मी येथून दररोज प्रवास करतो. मला चिंचवडपासून दापोडीपर्यंत यायला मोजून दहा ते पंधरा मिनिटे लागतात. मात्र दापोडी ते बोपोडी हे पाचशे मीटर अंतर कापण्यासाठी अक्षरश: अर्धा ते पाऊण तास लागतो. या ठिकाणी बोपोडी चौकात वाहतुकीचे नियोजन नसल्याने व रस्त्याला अडथळा ठरणारी छोटी वस्तीमुळे रस्ता चौकातच निमुळता होत जातो. परिणामी वाहनाचा वेग कमी होतो. लवकरात लवकर येथील समस्या प्रशासनाने सोडवावी.- सुरेंद्र भाटी, व्यापारीबोपोडीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. खडकी बाजाराकडून बोपोडीला जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. ते त्वरित करावे व रस्ता मोठा करावा. पुणे आणि पिंपरी-चिंचवड, येरवडा, चंदननगर यांना आयटी कंपन्यांनी वेढले असून, मोठ्या प्रमाणात कॉल सेंटरच्या गाड्या आणि दुचाकींवरून आयटीयन्स खडकी बाजार मार्गाचा वापर करत असल्याने दररोज खडकी ते बोपोडी रस्ता जाम असतो.- धर्मेश शहा, सामाजिक कार्यकर्ता