शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मालकाकडे मागितली १० लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 01:52 IST

तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही, तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल वामन भिडे (वय ५५, रा. जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावर पांचाली नावाचे हॉटेल असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली. या संदर्भात सविस्तर असे : फिर्यादीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता.कॉल करणाºयाने मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगितले. ‘मुंबई येथे एका व्यक्तीला पिस्तुल खरेदी करताना पकडले आहे. त्याने तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तरतुम्ही १० लाख रुपये द्या; अन्यथागुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करण्यात येईल,’ असे त्याने धमकावले. त्यामुळे भिडेयांनी शिवाजीनगर पोलिसांतफिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.असा घडतो गुन्हाज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहातो, याचा अभ्यास तोतया अधिकारी करतो. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव विचारून घेतो. यानंतर रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यानच संबंधित पोलीस ठाण्यात कॉल करून, ठाणे अंमलदाराला तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाशी बोलणे झाल्याचे भासवतो.ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, त्याला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यास सांगितले जाते. इतक्या रात्री पोलिसांनी बोलावले असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती घाबरून गेलेली असते. ही व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच, तिच्या मोबाइलवर फोन करून सेटलमेंटसाठी दबाव टाकला जातो. संबंधित व्यक्ती सेटलेमेंटला तयार झाल्यास तिला मुंबईला पैसे घेऊन बोलावले जाते.यापूर्वीदेखील घडला असा प्रकारया प्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत घडला होता. त्यालाही अशाच प्रकारे धमकावून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. मात्र, संबंधित पेट्रोल पंपचालकाने तक्रार दाखल केली नाही. या गुन्ह्यातही तोच प्रकार झाला आहे.