शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

टेमघरचे कार्यकारी अभियंतापद रिक्त

By admin | Updated: January 28, 2017 01:13 IST

धोकादायक पद्धतीने होत असलेल्या गळतीमुळे सध्या चर्चेत असलेल्या टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंतापद सात महिन्यांपासून रिक्त

पुणे : धोकादायक पद्धतीने होत असलेल्या गळतीमुळे सध्या चर्चेत असलेल्या टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंतापद सात महिन्यांपासून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर, धरणदुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही सरकारदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाल्याने पूर्णवेळ अभियंत्याची गरज आणखीच अधोरेखित होत आहे. राज्य सरकार गेली २ वर्षे दुष्काळात होरपळले होते. जिल्ह्यालादेखील त्याची मोठी झळ बसली होती. पुणे शहराला खडकवासला प्रकल्प साखळीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याअभावी गेल्या उन्हाळ्यात पाण्याचे रेशनिंग करण्याची वेळ आली होती. खडकवासला प्रकल्प साखळीतील पावणेचार टीएमसी क्षमतेचे टेमघर हे महत्त्वाचे धरण आहे. यंदा मॉन्सून चांगला झाल्याने प्रकल्प साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली. मात्र, पावसाळ्यातच टेमघरमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे समोर आले होते. अवघ्या १६ वर्षांपूर्वीचे हे धरण असल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी चौफेर टीका झाल्याने धरणाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हादेखील दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या धरणाच्या दुरुस्तीसाठी त्यातील पाणीसाठादेखील निम्मा आला आहे. मात्र, अजूनही धरणदुरुस्तीच्या कामाला ना मंजुरी मिळाली, ना पूर्णवेळ सक्षम अधिकारी मिळाला आहे.