शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

‘आकृती’मध्ये तांत्रिक गुणवत्तेचा आविष्कार; डीआरडीओतर्फे संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 12:30 IST

पुण्यातील एआयटी येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले.

ठळक मुद्दे१,२०० विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन विविध प्रकल्पांचे केले सादरीकरणएआयटीच्या दिघी कॅम्पसमध्ये आयोजिण्यात आला होता ‘आकृती’ महोत्सव

पुणे : पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी) येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले. जवळपास १,२०० विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. वार्षिक सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी)च्या दिघी कॅम्पसमध्ये ‘आकृती’ हा महोत्सव आयोजिण्यात आला होता. आठवडाभर रंगलेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक आकृती हा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धात्मक उपक्रम असून त्यात टेक्निकल चषकासाठी एआयटीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली. कोड रेड आणि ब्लाइंड कोडिंग, एनएएनडी इट आणि पीसीबी डिझायनिंगसारखे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कार्यक्रम, कॉण्ट्राप्शन आणि आॅटोकॅडसारख्या मेकॅनिकल इव्हेंट्सपासून रोबोटिक्सपर्यंतच्या अनेक तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण या महोत्सवात विद्यार्थ्यांनी केले.आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सव ‘सोल्यूशन्स २०१८’  हा एआयटीतर्फे आयोजिण्यात आलेला दुसरा इव्हेंट आहे. ‘भारत - विकसनशीलतेकडून विकसित होण्याकडे’ या थीमवर हा उपक्रम आधारित होता. संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रोबोटिक्स, गेमिंग आणि पेपर प्रेझेंटेशन या विभागांमध्ये आयोजिण्यात आलेल्या या महोत्सवातील एकूण ३५ इव्हेंटमध्ये २१ शिक्षण संस्थांतील १,२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुयोग्य व सशक्त स्पर्धात्मक दृष्टिकोनासह सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, व्हीआयआयटी आणि एमआयटीसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत झाली. यातील रोबोटिक्स इव्हेंटमध्ये सीएमई आणि एनडीएचे स्पर्धक संघही सहभागी झाले होते. ‘स्टुडंट अ‍ॅप्टिट्यूड आॅलिम्पियाड’ हा यंदा प्रथमच सादर केलेला वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंट होता. यात आर अँड डीई, एपीएस खडकी, एपीएस दिघी, एपीएस पुणे आणि एपीएस खडकवासला या संस्थांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. प्रसिद्ध व्यक्तींची विशेष व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजिण्यात आली होती.

क्षेपणास्त्र, रणगाडे ठरले आकर्षणडीआरडीओचे (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन) सहसंचालक आलोक मुखर्जी यांच्यातर्फे आयोजिण्यात आलेले डीआरडीओ प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण ठरले. त्याचसोबत, महत्त्वाच्या ठरलेल्या आर अँड डीई प्रदर्शनात क्षेपणास्त्रे आणि रणगाड्यांसारख्या विविध शस्त्रांची मॉडेल ठेवण्यात आली होती. या मॉडेलच्या माध्यमातून युद्धाच्या विविध पद्धती आणि त्यातील तांत्रिक प्रगतीची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

टॅग्स :dighiदिघीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDRDOडीआरडीओ