शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांनीच लैंगिक अत्याचारात गुंतविले, शिक्षक निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:03 IST

शिक्षकाची निर्दोष मुक्तता : बाल लैंगिक अत्याचाराचा होता गुन्हा

बारामती : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकाची बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून निर्दाेष मुक्तता करण्यात आली. शासकीय आयटीआय माळेगाव येथे नेमणुकीस असलेले शिक्षक शिवाजी बडे यांच्यावर ११ मार्च २०१४ रोजी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. ए. एस. आवटे यांच्यासमोर खटला चालला होता. परीक्षा केंद्रामध्ये कामावर असताना विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

साक्षीदारांच्या उलटतपासणीत या खटल्यात अत्यंत गंभीर व धक्कादायक समोर आलेली बाब म्हणजे, बडे ज्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात नोकरीला होते, त्याच केंद्रातील ३ महिला शिक्षकांनी या केंद्रातील ३७ मुलींवर दबाव टाकला. या मुलींना तुमच्या परीक्षेचा निकाल आमच्या हातात आहे, अशी भीती दाखवून बडे यांच्या विरोधात महिला दिनाचे औचित्य साधून अश्लील स्वरूपाच्या खोट्या तक्रारी देण्यास भाग पाडले. यामध्ये एका विद्यार्थिनीस फिर्याद नोंदवायला लावली होती. बडे व त्यांची पत्नी माजी पोलीस कर्मचारी आहे. दोघांनी मॅट न्यायालयामधून आदेश आणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीस घेण्यास वरिष्ठ प्रशासनास भाग पाडले होते. त्याचा राग व आकस प्रशासनातील लोकांना होता. परंतु, बडे यांच्या विरोधात तक्रार देऊनही, त्यातील काही विद्यार्थिनींना सदसद्विवेकबुद्धी सुचली. यातील एका विद्यार्थिनीने न्यायालयापुढे साक्ष दिली, की तीन महिला शिक्षकांनी ३५ ते ४० मुलींची बैठक घेतली. आमच्यावर दबाव टाकून बडे सरांविरोधात खोट्या व अश्लील स्वरूपाचे आरोप असलेल्या लेखी तक्रारी त्यांनी द्यायला लावल्या.उशिरा दाखल केली तक्रारहा खटला बारामती सत्र न्यायालयात सव्वाचार वर्षे चालला. सरकारी पक्षाला त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सात साक्षीदार मिळाले; परंतु ते विश्वासार्ह नव्हते. कारण पीडित मुलगी अथवा साक्षीदार यांनी कथित घटनेनंतर तत्काळ मुख्याध्यापक अगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदविली नव्हती.त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने उशिरा तक्रार दाखल केल्याचा युक्तिवाद आरोपींचे वकील अ‍ॅड. विशाल बर्गे यांनी केला. तसेच, बचाव पक्ष (बडे) यांच्यातर्फे अ‍ॅड. विजयराव बर्गे यांनी साक्षीदार तपासून सदरील खटला प्रथमदर्शनी खोट्या स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Puneपुणे