शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शिक्षकांचा मोर्चा; बदल्यांचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:20 IST

राज्याच्या शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारीचा बदल्यांचा अध्यादेश व २३ आॅक्टोबर रोजी घेतलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणी संदर्भातील निर्णय रद्द करावा, प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन कामे बंद करावीत, नोव्हेंबर २००५पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे.

पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारीचा बदल्यांचा अध्यादेश व २३ आॅक्टोबर रोजी घेतलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणी संदर्भातील निर्णय रद्द करावा, प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन कामे बंद करावीत, नोव्हेंबर २००५पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे, आदी मागण्यांसाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी शिक्षकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पुण्यातही मोर्चा काढून शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्या नेतृत्वात पुण्यात मोर्चा काढण्यात आला.- जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, उर्दू प्राथमिक शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राज्य शिक्षक परिषद, एकल शिक्षक मंच यांसह अन्य शिक्षक संघटनांचा सहभाग होता. मोर्चाच्या सुरुवातीला आमदार कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक