निर्मला अशोक डुंबरे असे या शिक्षिकेचे नाव आहे. डुंबरे या २८ सप्टेंबर २०१८ ला वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय शाळेबाहेर निघून गेल्या होत्या. शालेय कार्यक्षेत्राबाहेरील तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरी बोलावलेल्या सभेस विनापरवानगी उपस्थित राहणे, पतीच्या व अन्य लोकांच्या मदतीने सहकारी उपशिक्षक युसूफ अमीन आत्तार यांना मारहाण करणे, कार्यालयीन शिस्तीचे व कर्तव्याचे पालन न करणे, शासकीय कर्मचाऱ्यास कामकाजाच्या वेळेत मारहाण करून गैरवर्तन करून शालेय व प्रशासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होण्याच्या दृष्टीने कृती करणे, शालेय हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करुन शाळेच्या ठिकाणी उपस्थित न राहणे आदी विविध कारणांस्तव महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील नियम ३ (१) अन्वये पुणे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपशिक्षक या पदावरून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
दरंदाळेमळा (नारायणगाव) येथील शिक्षिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST