शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

शिक्षकांना व्हायचंय लिपिक

By admin | Updated: January 28, 2015 02:35 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. परंतु, शिक्षकाची नोकरी नाही, तर किमान लिपिकाची तरी नोकरी मिळावी म्हणून हे उमेदवार आता टायपिंग परीक्षेकडे वळले आहेत. परिणामी, परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०१४ घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या तब्बल ३ लाख ४८ हजारांवर पोहोचली आहे.परीक्षा परिषदेतर्फे १९९९मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला १ लाख ४६ विद्यार्थी ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा शेकडा निकाल ५३.४८ टक्के लागला होता. परंतु, शासकीय भरती प्रक्रिया बंद झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजारांपर्यंत खाली आली होती. तसेच ज्या वेळी शासनाकडून भरतीवरील बंदी उठविली जाते. त्यानंतर त्वरितच या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, असे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यातच काही वर्षांपासून दर वर्षी डीएड आणि बीएड पदवी घेऊन लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी शासकीय व खासगी कंपन्यांमध्ये लिपिकपदाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच २०१२पासून दर वर्षी २ लाखांहून अधिक विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देत असल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)