शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.

बारामती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.यंदा बारामतीतील १२ शाळांमध्ये फोरमने शाडूच्या मातीची २५० पोती दिलेली आहेत. प्रत्येक शाळेला गणेशमूर्तींचे साचेही दिलेले आहेत. याशिवाय, या मूर्ती तयार करण्यासाठी या १२ शाळांतील कलाशिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मूर्ती रंगविण्यासाठी शाळांना रंगही फोरमच्या वतीने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे रंगदेखील पर्यावरणपूरक आहेत.यंदा प्रत्येक शाळेत ३०० अशा साडेतीन हजार मूर्ती विद्यार्थ्यांच्या हातातून साकाराव्यात आणि त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असाव्यात असा फोरमचा प्रयत्न आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.हे प्रदूषण रोखणे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा वापर कमी करून शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे असे अनेक उद्देश या उपक्रमातून एकाच वेळी साध्य होतील, असे पवार यांनी सांगितले. बारामतीतील विविध शाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींचे काम वेगाने सुरू आहे. मुले अत्यंत उत्साह व आनंदाने बाप्पांना साकारण्यात गुंग झाल्याचे चित्र शाळाशाळांतून दिसत आहे.एखाद्या सेवाभावी संस्थेनेप्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने ३ हजारांवर मूर्तींची निर्मिती करण्याची ग्रामीण भागातील ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात प्रदूषण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.विद्यार्थी बनणार संदेशदूत...प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना संदेशदूत करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कुटुंबातून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.