पुणे : तिकीट तपासणीदरम्यान टीसीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना दौंड शटलमध्ये शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. उरुळी ते लोणी स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महेश जगदाळे (पूर्ण नाव पत्ता समजला नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाबासाहेब किसन भोसले (वय ५६, रा. प्रथमेश एक्झोटीका, एस. बी. पाटील रस्ता, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून काम करतात. दौंडहून निघालेल्या शटल गाडीत ते प्रवाशांची तिकिटे तपासत होते, त्या वेळी एका प्रवाशासोबत त्यांची बाचाबाची झाली.
दौंड शटलमध्ये टीसीला मारहाण
By admin | Updated: July 9, 2016 03:56 IST