शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

मिठाईच्या दुकानात टँकर घुसला; तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:04 IST

पुणे/धायरी : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाºया सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला.

पुणे/धायरी : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणा-या सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. हा टँकर सरळ विश्व आर्केड इमारतीमधल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसल्याने टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टँकरचालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची बातमी कळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.स्वाती मधुकर ओरके (वय २९, रा. कर्वेनगर, मूळ पुलगाव वर्धा) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. ती संगणक अभियंता होती, तर संदीप पाटील (वय ३०, वाल्हेकर कॉलनी, नºहे) आणि सुनील बाळासाहेब साळुंखे (वय ४१, भूमकरनगर, रा. नºहे) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद मारुती कणसे (वय ३०, मु. पो. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. दोघांना नवले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर, स्टेशन आॅफिसर प्रकाश गोरे, सतीश डाकवे, राजेश वाझे, संदीप पवार, मनोज ओव्हाळ यांनी ही कामगिरी केली.एक मिक्स सिमेंट घेऊन जाणारा टँकर कात्रजकडून येत होता. नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट समोरील विश्व आर्केड कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये घुसला.दोन वाहनांना ठोकर मारत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्या वेळी तेथे स्वाती ओरके व तीचे सहकारी ऊसाचा रस पिण्यासाठी आले होते़ टँकर अंगावर येत असल्याचे पाहताच सहकारी पळाले स्वाती पळताना पडली़ त्यामुळे तिला जीव गमवावा लगला़