पुणे : कुलूपबंद सदनिकेचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल दहा तोळे सोन्यासह ५० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुनील रोहिदास कांबळे (वय ३०, रा. फ्लॅट नं. ९, गजानन अपार्टमेंट, कोंढवा बु.) यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे बांधकाम व्यावसायिक आहेत. कामासाठी ते घर बंद करून बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये घुसून कपाटातील बोरमाळ, नेकलेस, लक्ष्मीहार, चेन असे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी घरी आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. (प्रतिनिधी)
सदनिका फोडून ऐवज लंपास
By admin | Updated: January 24, 2017 02:27 IST