शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न फोटो काढून ब्लॅकमेल करत महिलेचा केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:11 IST

पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका घरात केअर टेकर म्हणून काम करत असताना एका व्यक्तीने महिलेचे गुपचूप अर्धनग्न फोटो काढून ...

पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका घरात केअर टेकर म्हणून काम करत असताना एका व्यक्तीने महिलेचे गुपचूप अर्धनग्न फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात एका ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुप संजय केनकर (वय ३७, रा. जुनी सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादींचे वडिल वयस्कर असून त्यांच्या सेवेसाठी त्यांनी एका नर्सिंग ब्युरोच्या केनकर याला केअरटेकर म्हणून कामास ठेवले होते. गेल्या महिन्यात एके दिवशी फिर्यादी महिला रात्रीच्या सुमारास गोळी खाऊन फ्लॅटचा दरवाजा न लावता झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपीने गुपचूप महिलेचे अर्धनग्न फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर ते फोटो व व्हिडिओ फिर्यादींना दाखवून त्यांच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच, हे अश्लील फोटो फिर्यादींच्या बहिणीला पाठविले. इतरांना देखील हे फोटो पाठविण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे तक्रारदार महिला घाबरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून दत्तवाडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान मागील एक महिन्यापुर्वी कोथरुड परिसरात मध्यरात्री शस्त्राचा धाक दाखवत नर्सिंग ब्युरोच्या केअर टेकरने एका वृद्ध दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे बोगस नर्सिंग ब्युरोला आळा घालण्याची गरज असल्याचे दिसून येते.