शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

बंडखोरी टाळण्याची दक्षता घ्या

By admin | Updated: January 24, 2017 02:55 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. एका प्रभागामध्ये केवळ चौघांनाच तिकीट मिळू

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. एका प्रभागामध्ये केवळ चौघांनाच तिकीट मिळू शकणार आहे. उर्वरित इच्छुकांकडून ऐन निवडणुकीच्या काळात बंडखोरी होणार नाही याची तयारी आतापासूनच करा. इच्छुकांच्या बैठका घ्या, कमी दिवस राहिले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यासाठी वेळ घालविता येणार नाही आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोअर कमिटीच्या सदस्यांना केल्या.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त फडणवीस सोमवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी दुपारी अडीच वाजता पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस उज्ज्वल केसकर उपस्थित होते.पुणे महापालिकेमध्ये परिवर्तन घडवून आणून भाजपाची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांपासून विशेष लक्ष घातले आहे. भाजपाला बळ देण्यासाठी इतर पक्षांमधून आजी-माजी नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून प्रवेश दिला जात आहे. निवडणुकीच्या दैनंदिन घडामोडींवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. सोमवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, याची माहिती जाणून घेतली. प्रत्येकाला बोलण्याची संधी देऊन त्यांना त्यांची मते सांगण्यात आली. प्रत्येकाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले.पक्षाकडून सर्व प्रभागांचा सर्व्हे करण्यात आला आहे, त्यामुळे कुठल्या प्रभागात पक्षाची किती ताकद आहे, याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्व्हेनुसार जिथे पक्ष कमी पडत आहे, तिथे जास्त लक्ष दिले जावे. शासनाकडून मेट्रो, विकास आराखडा, जायका प्रकल्प आदी पुण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवावे, आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या नेत्यांच्या सभा हव्या आहेत, त्याची माहिती शहर कार्यालयाकडे द्यावी. त्यानुसार नेत्यांच्या सभांचे नियोजन केले जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी या वेळी सांगितले. पक्षाकडून मदतीची कुठेही आवश्यकता असल्याचे सांगा, त्यानुसार सर्वतोपरी मदत केली जाईल असे विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.