शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजी घ्या, भाजी..! मेथी ५ रुपये, शाळेतून निघाला आठवडेबाजाराचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:24 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळदरा (भाम) येथे शालेय विद्यार्थ्यांनी आठवडेबाजार भरविला होता.

वाकी बुद्रुक : शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळदरा (भाम) येथे शालेय विद्यार्थ्यांनी आठवडेबाजार भरविला होता.जीवनावश्यक भाजीपाला, कडधान्ये, खाऊचे पदार्थ यांचा समावेश होता. सकाळी ८ वाजता आठवडेबाजाराला सुरुवात झाली होती. वास्तविक जीवनात जगत असताना व्यावहारिक शिक्षणदेखील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, या हेतूने हा आठवडेबाजार आयोजिला होता, असे मत शाळेच्या सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.सकाळी या कार्यक्रमाच्याउद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक उपस्थित होते. भाजीबाजाराचे उद्घाटन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश कड, उद्योजक शरद कड, भाजपा उपाध्यक्ष पप्पू चव्हाण, सुधीर कड, राहुल कड, रुपेश कड, सदस्य नितीन कड, अर्जुन कड या मान्यवरांच्या, तसेच अनेक ग्रामस्थांच्या हस्ते झाले. आपल्या घरी असणाऱ्या शेतातून विद्यार्थ्यांनी भाजीपाला, तरकारी, तसेच कडधान्ये विक्रीसाठी आणली होती. मोठमोठ्याने आरोळ्या देत विद्यार्थ्यांनी आपला खप जास्त होण्यासाठी भर दिला होता. दिवसभर सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. 

टॅग्स :Puneपुणे