शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसृष्टीच्या जागेबाबत तातडीने निर्णय घ्या, मुक्ता टिळक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:43 IST

महापालिकेच्या वतीने चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा तिढा अद्याप कायम आहे

पुणे : महापालिकेच्या वतीने चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसृष्टी जागेच्या भूसंपादनाचा तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतीच शहरातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन माहिती दिली. तसेच शिवसृष्टीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार-खासदारांच्या भूमिकेबाबतचा अहवाल पालिकेच्या वतीने पुढील आठवड्यात शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.शिवसृष्टीसाठी चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखील फेबु्रवारीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक होऊन तीन महिने लोटले तरी अद्याप जागेच्या भूसंपादनाबाबत, बाधितांना देण्यात येणाºया मोबदल्याबाबत काहीच निर्णय झाला नाही.कचरा प्रकल्पाच्याजागेचा प्रश्न मार्गी लावामुख्यमंत्री विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टी व शहराच्या कचरा प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जागा तातडीने महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन केली. राज्यशासनाने महापालिकेस दिलेल्या काही जागांवर पालिकेने कचरा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. मात्र, त्या शासनाच्या मालकीच्या असून त्या शासनाकडून पालिकेस मिळणे अपेक्षित आहे. त्या जागा तातडीने मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करण्यात आली असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. या जागा मिळाल्यास महापालिकेस नवीन कचरा प्रकल्प उभारणे शक्य होणार असून कचरा समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.