पुणे - दारू आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण कमी आहे. गुन्हेगारांप्रमाणेच दागिन्यांची ओळख परेड घेतली तर शिक्षेचे प्रमाण वाढू शकते, अशी सूचना सीआयडीचे प्रमुख व अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांनी केली़राज्यात मे ते डिसेंबर २०१७ या कालावधीतील ११ प्रकरणांचा उत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षीस देऊन ४७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला़ विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, डॉ़ जय जाधव, पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते़या वेळी बोलताना सिंघल म्हणाले की, २०१३ पासून गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे़ मात्र, देशातील शिक्षांचे प्रमाण पाहता ते अजूनही कमी आहे़ राज्यातएकूण पावणेदोन लाखगुन्ह्यांपैकी ६० हजार गुन्हे हे मुंबई पोलीस अॅक्टचे असतात़त्यात २५ टक्के दारुशी संबंधितअसून त्यानंतर जुगार व अमली पदार्थांचे गुन्हे आहेत़ सव्वा दोन लाख गुन्ह्यांपैकी ४० टक्के गुन्हे दुखापतीचे असतात़या गुन्ह्यात हत्यार हस्तगत करणे अत्यावश्यक आहे़ अशा गुन्ह्यात पुढे फिर्यादी उलटतात़ चोरीमध्ये गेलेले दागिने तेच असल्याचे सिद्ध करावे लागते़ अशावेळी पोलिसांनी जशी आरोपींची ओळख परेड घेतो, अशी दागिन्यांची ओळख परेड घेतली तर शिक्षा होण्याच्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल़उत्कृष्ट अपराधसिद्धीसाठी निवड झालेल्या ११ गुन्ह्यांमधील ४७ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला़जून २०१७ :येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक सावंत, हवालदार प्रकाश लंघे, सचिन कदम, प्रदीप शेलार, नयना पुजारी खून खटला म्हणून गाजलेल्या प्रकरणात ३ आरोपींना फाशीची शिक्षा व जन्मठेपेची शिक्षा झाली़ तपास अधिकारी दीपक सावंत यांनी गुन्ह्याच्या तपासात प्रामाणिक प्रयत्न केल्याचा निकालपत्रात नमूद करण्यात आले होते़सप्टेंबर २०१७ :हडपसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, हवालदार एस़ जी़ भगत, व्ही़ एस़ वेदपाठक, अल्पवयीन मुलाचा अनैसर्गिक कृत्यासाठी खुन केला गेला़ गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन, पुराव्यांची सांगड घालून डीएनए तपासणीद्वारे गुन्हा सिद्ध केला़ खुनाबद्दल मुलाला जन्मठेप आणि त्याला मदत केल्याबद्दल वडिलांना ३ वर्षे शिक्षा झाली़आॅक्टोबर २०१७ :येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पाटील, विलास सोंडे, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, हवालदार राजाराम घोगरे, तुषार आल्हाट, अनोळखी मृतदेहाची व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला़ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली़समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बाबर यांनी मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन त्याचे अॅनालायसीस करुन त्याद्वारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २३ लाख ९८ हजार ६१४ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड जप्त केली होती़ त्यांचा उत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल गौरव करण्यात आला़
चोरीच्या दागिन्यांचीही ओळख परेड घ्या, अपर पोलीस महासंचालकांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 02:46 IST