यमुनाबाईंचे जीवनचरित्र अभ्यासक्रमात घ्यावे
By admin | Published: December 9, 2014 11:58 PM2014-12-09T23:58:42+5:302014-12-09T23:58:42+5:30
मुंबई विद्यापीठात लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या जीवनचरित्रवर आधारित 6क् गुणांचा अभ्यासक्रम आहे.
Next
पुणो : मुंबई विद्यापीठात लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या जीवनचरित्रवर आधारित 6क् गुणांचा अभ्यासक्रम आहे. त्याच धर्तीवर पुणो आणि कोल्हापूर विद्यापीठांत अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी यमुनाबाई वाईकरांचे भाचे शशिकांत जावळकर यांनी मंगळवारी केली.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लावणी महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर दत्तात्नय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, अंकुश काकडे, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.
जावळकर म्हणाले, ‘‘मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर पुणो आणि कोल्हापूर विद्यापीठात यमुनाबाईंच्या जीवन चरित्रवर अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. पारंपरिक लावण्यांचे जतन होत नाही. या लावण्यांविषयी अभिरुची कायम आहे. मात्र, त्याचा अभ्यास होणो गरजेचे आहे. पारंपरिक लावणीचे कलाकार अद्यापही पडद्याआड आहेत. त्यांना आज स्थान देण्याची गरज आहे.’’
बागुल म्हणाले, ‘‘एरंडवणो
भागात कला अकादमीसाठी 1क् एकर जागा आहे. तेथील जागा ही खास लावणी कलाकारांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये लावणीच्या कलाकारांना प्रॅक्टिससाठी भाडे द्यावे लागणार नाही. त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात येईल.’’
वाईकर म्हणाल्या, ‘‘दूरदर्शनवर दाखविण्यात येणा:या लावण्या या पूर्णत्वाकडे जाणा:या नसतात. सध्या पारंपरिक लावणी जपली जात नाही. त्यामुळे याविषयी अभ्यास होणो गरजेचे आहे. तसेच, पारंपरिक लावण्याचे कलाकार अद्यापही पडद्याआड असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)