आळंदी : भोसरी, आळंदी, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणा:या, तसेच पुणो, अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुंडास आळंदी पोलिसांनी मरकळ चौकात नाकाबंदीदरम्यान मंगळवारी पहाटे पावणोचार वाजता अटक केली. आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर नारायण ठाकूर (वय 34, रा. सोळू (ठाकूरवस्ती, ता. खेड, जि. पुणो) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार सराईत गुंडाचे नाव आहे.
ईश्वर ठाकूर हा मंगळवारी पहाटे बुलेट मोटारसायकल क्रमांक (एमएच 14 बीपी 9174) वरून आळंदीतील मरकळ चौकातून सोळू या आपल्या गावी जात होता. तडीपार आदेशाचा अवमान करून बेकायदेशीररीत्या पुणो जिल्ह्याच्या क्षेत्रत आला असताना त्यास आळंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले व त्याच्या मालकीची बुलेट मोटारसायकल जप्त केली.
पुणो ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या आदेशाने महामार्गावर नाकेबंदी सुरू केल्याने गुन्हेगारांचा वावर कमी झाला होता. परंतु नाकेबंदी केली असूनही तडीपार गुंड ठाकूरने आळंदीत येण्याचे धाडस केले. नाकेबंदीमुळे ठाकूर हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
तडीपार आदेश असतानाही पुणो जिल्हह्यात प्रवेश केल्याप्रकरणी ठाकूरवर आळंदी पोलिसांनी कारवाई केली. आळंदी पोलीस ठाण्याचे सपोनि. कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुजात अली इनामदार, मारुती शिंदे, गणोश शेंडे, एस. पी. घोटकर यांच्या पोलीस पथकाने ठाकूर यास अटक करण्याची कारवाई केली.