शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

तबला हाच माझा श्वास : पं. विजय घाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 07:00 IST

‘तबला’ हाच माझा धर्म आणि जात आहे. कलाकार असे मानतो की वाद्यात प्राण येतात. याकरिता आम्ही त्याची पूजा करतो. पूर्वीचे कलाकार म्हणायचे,  ‘देखते है साज क्या बोलता है?’. वाद्याचा सराव करूनही बघा वाद्याची इच्छा असेल तर तो बोलणार. 

नम्रता फडणीस -भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात साथसंगतीचे वाद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या  ‘तबला’ या तालवाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यात ज्या काही दिग्गज तबलावादकांचा सहभाग आहे. त्यामध्ये पुण्यातील एका कलाकाराचा आवर्जून उल्लेख केला जातो, ते नाव म्हणजे पं. विजय घाटे. सृजनात्मकता, कल्पकता आणि अचूकता या वादनांच्या वैशिष्टांसह सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे  ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून युवापिढीच्या पसंतीस उतरलेल्या पं. विजय घाटे यांना मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागाकडून सोमवारी (१८ नोव्हेंबर) भोपाळ येथे  ‘शिखर सन्मान पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त  ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद.या पुरस्काराबददलची भावना काय?  ल्ल माझा जन्म मध्यप्रदेशमधील जबलपूरचा आहे. १९८० पासून महाराष्ट्रात आणि त्यानंतर पुण्यात स्थायिक झालो. त्यामुळे आता पुणेकरच आहे. तिथे आता कुणीच नातेवाईक मंडळी नाहीत. पण आपली आठवण ठेवून दिलेल्या पुरस्काराचा आनंद काही औरच असतो.  कुटुंबीयांनी अशाप्रकारे केलेले कौतुक पाहून छान वाटते. तालवाद्याचा उगम कसा झाला?ल्ल तालवाद्याचा उगम शंकराच्या डमरूपासून झाला असं म्हणतात. डमरू म्हणजे दोन्ही बाजूला चामडे आणि त्याच्यावर एका रूद्राक्षाचा आघात, या आवाजातून नाद निर्माण झाला. डमरू वाद्य आजही अस्तित्वात आहे.  कला, संस्कृती फारशी अस्तित्वात नसताना नगा-यांच्या ध्वनींमधून संदेश दिले जायचे. संस्कृती पुढे सरकत गेली तसे मग मंदिरात कीर्तन व्हायला लागली, त्यात पखवाजचा वापर होऊ लागला. पखवाजाला म्हणूनच  ‘ पितासाज’ म्हटले जाते. त्यानंतर मुघल साम्राज्य आलं.  तबल्याच्या जन्माची कहाणी अशी आहे की मुघल दरबारातील दोन पखवाजवादकांमध्ये स्पर्धा व्हायची. मग एकाने चिडून  पखवाजचे दोन तुकडे केले. त्याला  ‘तबला’ आणि  ‘डग्गा’ असं नाव दिले. दोन तुकडे करून पंजांचा भाग बोटांवर आणला.    ‘तरी तो बोला, तब भी बोला’  म्हणून तो  ‘तबला’’ बनला. ^‘तबला’ या तालवाद्याची स्वतंत्र ओळख असूनही, त्याकडे साथसंगतीचे वाद्य म्हणूनच का पाहिले गेले? ल्ल मुळात  ‘तबला’ हे साथीचे वाद्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्याचा उपयोग साथीसाठीचं होत गेला. ठुमरी, शास्त्रीय संगीत, कव्वाली, गझल किंवा चित्रपट संगीत असो सर्व प्रकारच्या संगीतात तबल्याचा वापर झाला आहे. कारण तबल्याचे महत्व सर्वांनीच मान्य केले आहे. मात्र केवळ साथसंगतीचे वाद्य म्हणून नव्हे तर पूर्वी सुधारका दाढी यांनी तालवाद्याच्या स्वतंत्र मैफलीही केल्या आहेत. तालवाद्याच्या सादरीकरणात काही बदल झालेत का? तंत्रज्ञानाचा काही प्रभाव वाद्यांवर जाणवतोय का?ल्ल पारंपारिक तालवाद्याच्या वादनपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. उदा: तबल्यात जे बोल, शब्द, त्या तालाच्या भाषेत रचली गेलेली काव्ये यामधील वाजविण्याच्या पद्धतीत फारसा बदल घडलेला नाही. तंत्रज्ञानाचाही फारसा प्रभाव पडल्याचे जाणवत नाही. सांगीतिक कार्यक्रमांमध्ये कलाकारांबरोबर ट्यूनिंग कसं जमतं? ल्ल ही गोष्ट अनुभवातूनंच  येते. हाच अनुभव खूपकाही शिकवत जातो. फक्त डोळे, कान उघडे ठेवावे लागतात. दिग्गजांच्या सर्व गोष्टी मान्य करायच्या. माझचं खरं हा अहंभाव दूर ठेवून सादरीकरण करायचं. हे जमलं की कोणत्याही कलाकाराबरोबर ट्यूनिंग जमणं फारस अवघड नाही. 

.....

‘फ्युजन’ चा अर्थ दोन आवाज एकत्र येणे. दोन विभिन्न सांगीतिक विचारांचे मेंदू जवळ आले की वेगळ्याच प्रतिभेचे दर्शन घडते. ‘फ्युजन’ हे सी. रामचंद्र, ओ.पी नय्यर यांनीही कधीच सुरू केले होते.‘फ्युजन’ कधीच वाईटअसू शकत नाही. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकला