पुणे : सिम्बायोसिस संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून (दि.२३) सुरुवात होत आहे. हा महोत्सव २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पुणेकर रसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी अभिनेता नीरज काबी यांना सिम्बायोसिस सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खुल्या प्रेक्षागृहात दररोज सायंकाळी ६.३० वाजता नामवंत कलाकार विविध कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेता नीरज काबी हे सिम्बायोसिसचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येतो.
सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सव आजपासून
By admin | Updated: January 23, 2017 03:19 IST