शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेची शपथ, प्रभातफेरी, मतदार जागृती रॅली

By admin | Updated: January 28, 2017 01:53 IST

६८वा प्रजासत्ताक दिन विविध संघटना, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : ६८वा प्रजासत्ताक दिन विविध संघटना, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मतेची शपथशिवाजीनगरच्या मृत्युंजय मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. फैयाज शेख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.घोरपडे पेठेतील रामभाऊ ननावरे चौकात महाराष्ट्र राज्य जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे संसदीय महामंडळाचे सदस्य अशोक गायकवाड यांच्या वतीने ध्वजवंदन, तिळगूळवाटप व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विलास भंडारी, इस्माईल शेख, इब्राहिम यवतमाळवाले, चंद्रकला पुंडे, चंदा कदम, मनीष सुटे, अ‍ॅड. शबीर खान आदी उपस्थित होते.नेत्रचिकित्सा शिबिर,फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेच्या विविध शाखांच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर, खाऊवाटप, शालेय वस्तूंचे वाटप, अंध मुलांना अभ्यासिका मशिनचे वाटप, निराधार महिलांना साड्यावाटप, तसेच रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कराटेची प्रात्यक्षिकेमहाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उज्ज्वला पळीवाले उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी कराटेची प्रात्याक्षिके व पिरॅमिडचे सादरीकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला देशमुख, पर्यवेक्षिका अनुजा पाटील, सि. धों. आबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्याणी साळुंके, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिक्रमा अनुभवकथनयोग-आनंद संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नर्मदा परिक्रमा २ वेळा पूर्ण केलेले लक्ष्मण दगडे यांचा सत्कार आनंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. लक्ष्मण दगडे यांनी या वेळी त्यांच्या परिक्रमेतील अनुभवांचे कथन केले. या वेळी योग आनंद संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गांधी, महादेव औंधकर, हेमंत गांधी, संजय जकाते, सुनील निवते, विनायक दगडे, विकास घाणेकर आदी उपस्थित होते. गुणवंताने केले ध्वजवंदननूमवी प्रशालेतही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १२वी बोर्ड परीक्षेत वाणिज्य शाखेत प्रथम आलेली विजया राठोड हिच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, आझम कॅम्पस येथे भारताचे माजी केंद्रीय मंत्री अरीफ खान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार होते. तिरंगा सन्मान रॅलीमिशन आॅफ आंबेडकर या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा सन्मान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा मिशन आॅफ आंबेडकर या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मोमिनपुरा सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सर्व समाजासाठी हीजामा, शुगर चेकअप, उच्च रक्तदाब तपासणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.