शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू, डेंगी यांचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 02:13 IST

प्रतिबंधक उपाययोजना : सरकारी, खासगी दवाखान्यांत गर्दी

कर्वेनगर : मावळेआळीमध्ये साथीचा आजारांनी थैमान घातले असून या ठिकाणी अनेक नागरिक आजारी पडले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पालिका आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट केली नाहीत. या कारणाने साथीचे आजार वाढले गेले आहेत. यावर प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पतितपावन संघटनेचे मजदूर माथाडी कामगार संघटना अध्यक्ष राजेश मकवान यांनी केली आहे.

काही आठवडे झाले सतत पाऊस पडत आहे. कचरा कुजलेल्या स्थितीत असल्याने सर्वच ठिकाणी दुर्गंधी पसरली असून पालिका साफसफाई करत आहे की नाही, याबाबत शंका येते. कर्वेनगरमध्ये मावळेआळी, आकाश मित्र मंडळाजवळ, गोसावी वस्ती, कामना वसाहत, वनदेवी वसाहतीजवळ अनेक ठिकाणी डांसाची उत्पत्तीस्थळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे या स्थळांचा परिसरात आजार वाढले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकताच पालिकेला डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमे वापरली गेली पाहिजेत; पण आरोग्यमंत्र्यांचा आदेशाची अंमलबजावणी होणार का? हा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी २५-३० लोकांना डेंगीची लागण झाली असून ते खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. काहीच प्रकृती चिंताजनक असून काहीची स्थिर आहे. दरम्यान, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हा प्रभाग येत असून तेथे औषधफवारणी करावी, डबकी नष्ट करावीत, पालिकेच्या दवाखान्यात औषधे सहज उपलब्ध व्हावीत अशा नागरिकांच्या मागण्या आहेत.पालिका आरोग्य विभाग साथीचा आजारांबाबत जनजागृती करीत आहे. औषधफवारणी नियमित होऊन लवकरच डबकी नष्ट करण्यात येतील. - दौलत चोपडे,हिवताप निरीक्षक

टॅग्स :dengueडेंग्यूPuneपुणे