शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोहननगरात एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: February 21, 2015 02:09 IST

शहरामध्ये शुक्रवारी स्वाइन फ्लूने दोन बळी घेतले. दत्तात्रय नारायण नामदे (५९, रा. गवळीवाडा, मोहननगर, चिंचवड) यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला.

पिंपरी : शहरामध्ये शुक्रवारी स्वाइन फ्लूने दोन बळी घेतले. दत्तात्रय नारायण नामदे (५९, रा. गवळीवाडा, मोहननगर, चिंचवड) यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. त्यांना पाच ते सहा दिवस आधी ताप आला होता. मात्र, त्यावर प्राथमिक उपचार केले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात सायंकाळी दाखल केले. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यातच त्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागाला मिळाला. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून हलवणार होते. त्या वेळी कार्डिया रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास विलंब लागला. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात हलवता आले नाही. ते टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झाले होते. समाजातील विविध संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)अहिल्या किसन लोखंडे (५५, रा. मरकळ, ता. खेड ) यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे शुक्रवारी समजले. त्यांना मंगळवारी वायसीएममध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी मिळाल्याने त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजाराचे निदान लवकर न झाल्यामुळे त्यांना उपचारही मिळाले नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.