पौड : जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या स्वाती हुलावळे यांचे पती सुरेश हुलावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने माण- हिंजवडी गटातून उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या स्वाती हुलावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे मुळशीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाराज हुलावळे या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की, स्वत: अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार, याकडे मुळशीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या १३ तारखेला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सुरेश हुलावळे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज ते मागे घेणार, की संपूर्ण गटातील नाराजांना एकत्र करून अपक्ष रिंगणात उतरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
स्वाती हुलावळे यांचा राजीनामा
By admin | Updated: February 13, 2017 02:24 IST